- News
- सिटी क्राईम
- एमजीएमच्या विद्यार्थिनीला कॉल करून म्हणे, हॉटेलवर झोपायला ये…!
एमजीएमच्या विद्यार्थिनीला कॉल करून म्हणे, हॉटेलवर झोपायला ये…!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमजीएमच्या विद्यार्थिनीला कॉल करून छेड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉल करणाऱ्याने तिला अश्लील मागणी करत हॉटेलमध्ये झोपायला ये, असे बोलून विनयभंग केला. सिडको पोलिसांनी त्या कॉल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. पीडित विद्यार्थिनी एमजीएम कॉलेजमध्ये शिकते व होस्टेलमध्ये राहते. तिला ५ ते ८ […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमजीएमच्या विद्यार्थिनीला कॉल करून छेड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉल करणाऱ्याने तिला अश्लील मागणी करत हॉटेलमध्ये झोपायला ये, असे बोलून विनयभंग केला. सिडको पोलिसांनी त्या कॉल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
मुकुंदवाडीत पाचवर्षीय चिमुकलीचा वडिलांकडूनच विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या आईनेच या प्रकरणात पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नराधम फरारी झाला. मुलगी कायम घाबरलेली राहत असल्याने आईने विचारणा केली. मात्र तिने काही सांगितले नाही. त्यानंतर आईला संशय आल्याने त्यांनी तिला मोबाइलवर गुड टच, बॅड टचचा व्हिडीओ दाखवला.
छावणीत आधी मुलीची छेड, नंतर तिच्या आईला मारहाण…
मुलीची छेड काढणाऱ्याची तक्रार करण्यासाठी मुलीची आई त्याच्या आई-वडिलांकडे गेली. तेव्हा तरुणासह त्याच्या घरच्यांनी मुलीच्या आईलाच मारहाण केली. ही घटना ६ जुलै रोजी रात्री ११:३० वाजता शहा कॉलनीत घडली. या प्रकरणात आता छावणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात अाली आहे. तक्रारीनुसार, पीडित मुलगी व संशयित तरुण एकाच परिसरात राहतात.
इफ्तेकार शहा मुलीचा पाठलाग करून छेड काढतो. तो कायम नशेत असतो. याबाबत मुलीने आईला सांगितले. त्यानंतर मुलीची आई त्याच्या आई-वडिलांकडे तक्रार करण्यासाठी गेली. त्यावेळी अन्सार शहा, निसार शहा, इफ्तेकारसह एका महिलेने त्यांना मारहाण केली. छावणी पोलिसांनी अन्सार, निसार, इफ्तेकारसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

