अंबानींच्या सुनबाईंची पैठणच्या एनकोर हेल्थकेअर कंपनीला भेट, स्वतः संचालिका आहेत, कामांचा घेतला आढावा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण एमआयडीसीतील एनकोर हेल्थकेअर (Encore Healthcare) या औषधी निर्मिती कंपनीला सोमवारी (१ डिसेंबर) अंबानी परिवाराच्या सूनबाई राधिका मर्चंट- अंबानी यांनी त्यांचे वडील विरेन आणि बहीण अंजली यांच्यासह भेट दिली. मुंबईहून खासगी विमानाने छत्रपती संभाजीनगर, तिथून हेलिकॉप्टरने पैठण आणि कारने कंपनीत हे कुटुंबीय आले. त्यानंतर त्याच पद्धतीने परतले. या दौऱ्याची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

मर्चंट कुटुंबीयांची पैठण एमआयडीसीत एनकोर हेल्थकेअर कंपनी आहे. राधिका या स्वतः या कंपनीच्या संचालक आहेत. एप्रिलमध्ये या कंपनीत आग लागली होती. एका कामगाराचा होरपळून मृत्‍यू झाला होता, तर दोन कामगार जखमी झाले होते. त्यानंतर कंपनी काही काळ बंद होती. कंपनी नव्याने सुरू केल्यानंतर आढावा घेण्यासाठी राधिका आल्या होत्या, असे सूत्रांकडून समजते. रविवारी (३० नोव्‍हेंबर) रात्री राधिका, त्यांचे वडील आणि बहीण खासगी विमानाने छत्रपती संभाजीनगरला आले. रात्री मुक्काम केला. सकाळी ११ ला चिकलठाणा विमानतळावरून हेलिकॉप्टरने पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरले. तिथून कंपनीच्या वाहनांच्या ताफ्यातून कंपनीत आले. राधिका यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असून, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचा बंबही कंपनीत परिसरात तैनात होता. स्थानिक पोलिसांना मात्र दौऱ्याची माहितीच नव्हती. आणखी दोन दिवस आज आणि उद्या (२ व ३ डिसेंबर) सुद्धा राधिका या कंपनीला भेट देणार आहेत. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software