Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तलावात पोहत असताना दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नायगाव (हर्सूल सावंगीजवळील) शिवारात शुक्रवारी (६ मार्च) सकाळी १० च्या सुमारास समोर आली. फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

शेख रिहान शेख अहमद (वय १८, रा. बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) व इम्रान शेख इरफान शेख (वय १७, रा. बायजीपुरा, ह. मु. नायगाव) अशी मृत्यू झालेल्या मुलांची आहेत. रिहान आणि इम्रान मित्र असून, इम्रान चार महिन्यांपूर्वी आई-वडिलांसह नायगाव येथे राहण्यासाठी आला होता. शेख इम्रान नायगाव येथे पेंटिंगचे काम करायचा, तर शेख रिहान बायजीपुऱ्यात लाइट फिटिंगचे काम करत होता. गुरुवारी (५ मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास दोघे नायगावहून गणोरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते.

सायंकाळपर्यंत दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीय, नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांचे बूट व दोन मोबाइल आढळले. दोघे तलावात बुडाल्याची शक्यता निर्माण झाली. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दोन तास प्रयत्न केल्यानंतर दोघांचेही मृतदेह तलावात मिळून आले. मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर दुपारी बायजीपुऱ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद फुलंब्री पोलिसांनी घेतली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश

Latest News

लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाचखोर तत्कालीन पोलीस अंमलदार यमाजी लक्ष्मण खटाणे (रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला शुक्रवारी (६...
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software