चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला पतीची बेदम मारहाण, आंबेलोहळची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३२ वर्षीय महिलेला चारित्र्यावर संशय घेऊन पतीने मोटारसायकलच्या समोरील शॉकअपच्या दांड्याने बेदम मारहाण केली. यात महिला जखमी झाल्याने तिला घाटी रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना १२ मार्चला सायंकाळी सातच्या सुमारास आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे घडली. महिलेने बुधवारी (१८ मार्च) वाळूज एमआयडीसी पोलिसांत सायंकाळी सातला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, महिला मिस्तरी कामे करते. ती कामावरून घरी आली तेव्हा पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. महिलेने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने घरातील मोटारसायकलच्या समोरील शॉकअपच्या दांड्याने तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोराने मारून जखमी केले. तिच्या भायाने येऊन भांडण सोडवले. महिलेला जखमी अवस्थेत मुलाने घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.  डॉक्टरांनी तिला ऑपरेशन सांगितले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राम तांदळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पती-पत्नीच्या भांडणात तिसऱ्याने येऊन ‘तिला का मारतो’ म्हणत पतीला चाकूने भोसकले!, नारेगावची घटना

Latest News

पती-पत्नीच्या भांडणात तिसऱ्याने येऊन ‘तिला का मारतो’ म्हणत पतीला चाकूने भोसकले!, नारेगावची घटना पती-पत्नीच्या भांडणात तिसऱ्याने येऊन ‘तिला का मारतो’ म्हणत पतीला चाकूने भोसकले!, नारेगावची घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती-पत्नीचे भांडण सुरू असताना तिसऱ्याने येऊन तिला का मारतो, असे म्हणून पतीला चाकूने भोसकून...
चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला पतीची बेदम मारहाण, आंबेलोहळची घटना
सेवानिवृत्तांची घरे चोरट्यांकडून टार्गेट?; उस्मानपुऱ्यात दोन घरे फोडून २ लाखांचा ऐवज लांबवला
१६ वर्षांची मुलगी आईदेखत ३१ वर्षीय प्रियकरासोबत दुचाकीवर बसून गेली पळून..., सातारा परिसरातील घटना
डोक्यापासून हनुवटीपर्यंत चाकूने मारून २१ वर्षीय तरुणाला केले गंभीर जखमी, जयभवानीनगरातील थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software