दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ झाली. प्रति तोळा १ लाख ५६ हजार रुपयांवर दर पोहोचले. सध्या इराण-इस्त्रायल युद्धामुळे बाजारपेठेत निर्माण अनिश्चितता आणि दरांतील विक्रमी वाढ यामुळे आज, १९ मार्चला सकाळपासून सराफा बाजारात अपेक्षित अशी खरेदीदारी बघायला मिळाली नाही. यंदा सोने, चांदीच्या नाण्यांच्या खरेदीकडे अनेकांचा कल दिसून येत आहे.

गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सोने आणि चांदी ग्राहक खरेदी करत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचा दर किंचित घसरून १ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त होत होती, प्रत्यक्षात दुपारपर्यंत तसे काही चित्र दिसून आले नाही. चांदीचा दर प्रति किलो २ लाख ५६ हजार रुपयांवर स्थिर राहिला.
दरवाढ कशामुळे?
डॉलरच्या तुलनेत रुपयामधील घसरण आणि विविध देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दराने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मात्र, गुढीपाडव्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने उच्च दरांकडे ग्राहकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसले. मात्र सोन्याच्या नाण्यांच्या खरेदीकडे कल दिसत आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 

Latest News

भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..!  भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी एका नगरसेवकाचे नाव पुढे करून चक्क पोलिसांनाच वर्दी उतरविण्याची धमकी...
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
पिसादेवीत आज संध्याकाळी सहाला टी. राजा सिंह यांची जाहीर सभा
बी.कॉम. झालेला तरुण ड्रग्जच्या आहारी गेला, पत्नी सोडून गेली, तो अधिकच बिघडला... सिटी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software