छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा भगवान महावीर जयंती ठरणार आदर्शदायी : ३१ मार्चला भव्य डीजेमुक्त शोभायात्रा, सामाजिक उपक्रमांवर भर, गॅस तुटवड्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम स्थगित

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भगवान महावीर जयंतीनिमित्त यंदा मंगळवारी (३१ मार्च) छत्रपती संभाजीनगर शहरात सकल जैन समाज व भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी यांच्या हस्ते गुरुवारी (१९ मार्च) झाले. जाधवमंडी येथील विमलनाथ श्वेतांबर जैन मंदिरात संपर्क कार्यालय सुरू झाले आहे.

यंदा जयंती सोहळ्यात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांवरही भर देण्यात येणार असून, माझे शहर, माझी जबाबदारी या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शोभायात्रेचे २६ वे वर्ष आहे. महोत्सव समिती कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रतीक साहुजी, महिला सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा प्रिती साहुजी यांच्यासह झुंबरलाल पगारिया, अनिलकुमार संचेती, कौशिक सुराणा, मुकेश साहुजी, अमोल पुर्णेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महिला सांस्कृतिक समितीतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. महोत्सवातील विविध उपक्रमांची माहिती विलास साहुजी यांनी दिली. सूत्रसंचालन सविता लोढा यांनी केले.

सकल जैन समाजाचे कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, प्रशांत देसरडा यांच्यासह महोत्सव समितीचे अजय सिंघवी, सारिका साहुजी, बाहुबली वायकोस, ललिता साखला, मिठालाल कांकरिया, पंकज साखला, मनिषा भन्साली, श्रेणिक कासलीवाल, वैशाली धोंगडे, हितेश कांकरिया, अनिता पहाडे, प्रिया चोरडिया, सविता लोढा, दिगंबर क्षीरसागर, रवी मुगदिया, मदनलाल आच्छा, चांदमल सुराणा, डी.डी. वायकोस, नीलेश सावळकर, डॉ. प्रकाश झांबड, विनोद बोकडिया, ऋषभ कासलीवाल, भारती बागरेचा, प्रिती सेठिया, निता गादिया, ज्योती सुगंधी, तनुजा गांधी, आशा कासलीवाल, रुपाली मुथा, सविता अजमेरा, भावना सेठिया, करुणा साहुजी, संगिता संचेती, सविता गोसावी, सारिका साहुजी, साधना शाह, भारती संगवे, कल्पना मेहता आदींची उपस्थिती होती. यंदा गॅस तुटवडा असल्याने महावीर जयंतीच्या दिवशीचा महाप्रसादाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. शिवाय शुभेच्छा संदेश देणारे बॅनर, फ्लेक्स न लावण्याचाही निर्णय महोत्सव समितीने घेतला आहे. दरवर्षी शोभायात्रा डीजेमुक्त असते. यंदा मंगलवाद्य, तसेच विविध भक्ती संगीत ग्रुपतर्फे धार्मिक व देशभक्तिपर गीते सादर केली जातील.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस!

Latest News

मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस! मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगो विमान कंपनीने ‘समर शेड्यूल'मध्ये छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस केली आहे....
छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा भगवान महावीर जयंती ठरणार आदर्शदायी : ३१ मार्चला भव्य डीजेमुक्त शोभायात्रा, सामाजिक उपक्रमांवर भर, गॅस तुटवड्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम स्थगित
२२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना
प्रा. राजाराम लोंढे हत्या प्रकरण : अंगठ्या, मोबाइल जप्त करण्यात यश येईना, करण आडेच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ
शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software