- News
- पॉलिटिक्स
- औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडा...
औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष, कट्टर हिंदुत्ववादी नेते टी. राजासिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इतिहास लिहिण्याची हीच संधी असून, औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून फेकण्याचे आवाहन केले. त्यासाठी हवे तितके हिंदू पुढे येतील, असे ठामपणे सांगितले. कबर उखडून त्या जागी मुत्रालय बांधा, अशी मागणीही त्यांनी केली.
टी. राजासिंह यांनी एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली. जलील म्हणतात, की अब हम बदला लेंगे... त्यांची एवढी हिंमत कशामुळे वाढली? आपल्या विभाजनामुळे त्यांची हिंमत वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष एमआयएम निवडून आला आहे. मालेगावमध्ये तर चक्क त्यांनी महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. हे फक्त आपण जातिवादात विखुरल्यामुळेच होऊ शकले. ओवेंसीचा पक्ष आणि इस्लाम पार्टी हळूहळू महाराष्ट्राला खाऊ टाकतील, असा इशारा टी. राजासिंह यांनी दिला.
पंतप्रधान मोदींना आवाहन...
पंतप्रधान मोदींकडे टी. राजासिंह यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा अंमलात आणण्याची मागणी केली. हम दो हमारे दो आहेत तर त्यांचेही दोनच राहिले पाहिजेत. दोनपेक्षा एकही अपत्य त्यांना जास्त झाले तर त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ देऊ नका. उलट १ लाख रुपये दंड ठोका, जेणेकरून ते जन्मालाच घालणार नाहीत.
मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक आणले. त्याबद्दल टी. राजासिंह यांनी अभिनंदन केले. मात्र या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी केली. ज्या जिल्ह्यात धर्मांतर झाले, त्या जिल्हाधिकाऱ्याला थेट निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.

