- News
- पॉलिटिक्स
- अंबादास दानवेंवर सौदेबाजीचा आरोप, जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांचा केला १८ कोटींना सौदा,...
अंबादास दानवेंवर सौदेबाजीचा आरोप, जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांचा केला १८ कोटींना सौदा, ४ कोटी स्वतः हडपले... ‘या’ सदस्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर शिऊर गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी गुरुवारी (१९ मार्च) केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दानवे यांनी ठाकरे गटाच्या नऊही सदस्यांचा १८ कोटी रुपयांत सौदा केला. त्यातील ४ कोटी रुपये स्वतः हडपल्याचे निकम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ओलीस ठेवून मोबाइल काढून घेतले...
ठाकरे गटाच्या नऊही सदस्यांना १० ते १७ मार्च या कालावधीत इगतपुरी, ठाणे, नवी मुंबई, कर्जत आणि गोवा अशा विविध ठिकाणी सहलीला नेण्यात आले. तिथे ओलीस ठेवून आमचे मोबाईल काढून घेतले होते, असे सांगून निकम म्हणाले, की आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करायचे होते. मात्र दानवेंना हे मान्य नव्हते. त्यामुळे कडक पहारा असतानाही १७ मार्चला ‘मॉर्निंग वॉक'च्या बहाण्याने मी व ललिता सोनवणे यांनी पलायन केले. यानंतर इतरांचीही सुटका झाली. पक्षप्रमुखांनी आम्हाला भाजप किंवा शिंदे गटासोबत जाणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. म्हणूनच आम्ही मतदान प्रक्रियेपासून लांब राहिलो, असे निकम यांनी स्पष्ट केले.
अंबादास दानवे यांनी निकम यांच्या आरोपांचे खंडन करताना स्पष्ट केले, की आम्ही कोणासोबत आणि कशाचा सौदा केला ते संजय निकम यांनी सांगावे. त्यांना ओलीस ठेवण्याचा प्रश्नच नाही. ते त्यांच्याच गाड्यांमधून फिरत होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रात्री ते कोठे होते, हेदेखील निकम यांनी सांगावे. बिनबुडाचा आरोप करणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, असे दानवे म्हणाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
Latest News
20 Mar 2026 10:46:16
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सताळा पिंपरी (ता. फुलंब्री) येथील एका २२ वर्षीय तरुणीला वारंवार कॉल करून प्रेमासाठी जबरदस्ती करणाऱ्या...

