शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २५ वर्षांपासून केवळ प्रतीक्षाच असलेल्या शहर पाणी योजनेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (१९ मार्च) दखलपात्र प्रगती झाली. जायकवाडी धरणात उभारलेल्या जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात सायंकाळी ४:४० वाजता यश आले. महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी जॅकवेलमध्ये उभे राहून पाण्याचे दोन घोट पिले आणि गोदामाईचे आभार मानले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

धरणातील पाणी गुरुवारी सकाळी ११ ला सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये घेण्यात येणार होते. परंतु, किरकोळ तांत्रिक अडचण आली. ती दूर करण्यात सहा तास गेले. अखेर जॅकवेलमध्ये पाणी येण्यास सायंकाळचे ४:४० वाजले. धरणात ३४ मीटर खोल जॅकवेलमध्ये महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी जाऊन फेसाळलेले पांढरेशुभ्र पाणी दोन घोट पिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. आज, २० मार्चला आणखी काही प्रमाणात पाणी घेऊन विविध टप्प्यांवर लिकेजची तपासणी केली जाईल. दोन- तीन दिवस पाणी साठवून ठेवले जाणार असून, कुठेही लिकेज नसल्याची खात्री झाल्यावर पंपाची टेस्टिंग केली जाईल. नंतर पाणी २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांत घेण्यात येईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे म्हणाल्या, की टेस्टिंग झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रांतून शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचवले जाणार आहे. तिथून घरांपर्यंत पाणीपुरवठा केला जाईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस!

Latest News

मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस! मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगो विमान कंपनीने ‘समर शेड्यूल'मध्ये छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस केली आहे....
छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा भगवान महावीर जयंती ठरणार आदर्शदायी : ३१ मार्चला भव्य डीजेमुक्त शोभायात्रा, सामाजिक उपक्रमांवर भर, गॅस तुटवड्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम स्थगित
२२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना
प्रा. राजाराम लोंढे हत्या प्रकरण : अंगठ्या, मोबाइल जप्त करण्यात यश येईना, करण आडेच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ
शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software