सेवानिवृत्तांची घरे चोरट्यांकडून टार्गेट?; उस्मानपुऱ्यात दोन घरे फोडून २ लाखांचा ऐवज लांबवला

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता चोरट्यांनी सेवानिवृत्तांची घरे लक्ष्य केली असून, प्रतापनगर आणि श्रेयनगरात दोन सेवानिवृत्तांची घरे फोडून चोरट्यांनी २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

किरण बालाजीराव कुलकर्णी (वय ६५, रा. प्रतापनगर, कासलीवाल रेसिडेन्सी, उस्मानपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ते सेवानिवृत्त असून, पत्नीसह राहतात. ९ मार्चला सकाळी ६ च्या सुमारास पती-पत्नी पुणे येथे मुलाला भेटायला गेले होते. बुधवारी (१८ मार्च) परतले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात पाहिले असता दोन्ही लाकडी कपाटांचे ड्रॉवर तुटलेले होते. त्यातून चोरट्यांनी ३० हजारांचे मिनीमंगळसूत्र, ३० हजार रुपयांचे कानातील सोन्याचे दोन जोड, ३० हजार रुपयांची चांदीची भांडी, १ हजार रुपयांचे पायातील जोडवे, ३०० रुपयांची हातातील घड्याळ, १० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ६ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसले. उस्मानपुरा पोलिसांनी कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार मंदा सामसे करत आहेत.

दुसऱ्या चोरीची तक्रार सुरेश बापूराव खडके (वय ७१, रा. श्रेयनगर, श्रीराम बिल्डिंग, उस्मानपुरा) यांनी दिली आहे. ते सेवानिवृत्त असून पत्नीसह राहतात. त्यांची मुले कामानिमित्त मुंबईला असतात. त्यांचे लहान भाऊ त्यांच्या वरच्या फ्‍लॅटवर राहतात. गुरुवारी (१९ मार्च) सायंकाळी सुरेश खडके, त्यांची पत्नी सुनिता खडके, भाऊ रमेश खडके व रमेश यांची पत्नी वैशाली हे चौघे गुढीपाडवा असल्याने उस्मानपुऱ्यातील राम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी सातला दर्शन करून घरी परतले असता कपाटातील सामान व कपडे अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये चोरीला गेले होते. रमेश यांच्या फ्‍लॅटमध्ये चोरी होऊन चोरट्यांनी कपाटातील ३० हजार रुपये चोरून नेल्याचे दिसले. सुरेश खडके यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दीपक खिल्लारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पती-पत्नीच्या भांडणात तिसऱ्याने येऊन ‘तिला का मारतो’ म्हणत पतीला चाकूने भोसकले!, नारेगावची घटना

Latest News

पती-पत्नीच्या भांडणात तिसऱ्याने येऊन ‘तिला का मारतो’ म्हणत पतीला चाकूने भोसकले!, नारेगावची घटना पती-पत्नीच्या भांडणात तिसऱ्याने येऊन ‘तिला का मारतो’ म्हणत पतीला चाकूने भोसकले!, नारेगावची घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती-पत्नीचे भांडण सुरू असताना तिसऱ्याने येऊन तिला का मारतो, असे म्हणून पतीला चाकूने भोसकून...
चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला पतीची बेदम मारहाण, आंबेलोहळची घटना
सेवानिवृत्तांची घरे चोरट्यांकडून टार्गेट?; उस्मानपुऱ्यात दोन घरे फोडून २ लाखांचा ऐवज लांबवला
१६ वर्षांची मुलगी आईदेखत ३१ वर्षीय प्रियकरासोबत दुचाकीवर बसून गेली पळून..., सातारा परिसरातील घटना
डोक्यापासून हनुवटीपर्यंत चाकूने मारून २१ वर्षीय तरुणाला केले गंभीर जखमी, जयभवानीनगरातील थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software