भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी एका नगरसेवकाचे नाव पुढे करून चक्क पोलिसांनाच वर्दी उतरविण्याची धमकी दिली. त्यांनी आपले क्रूझर वाहन भररस्त्यात लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. पोलिसांनी वाहन बाजूला घ्यायला सांगितल्याचा त्यांना इतका राग आला, की चक्क अश्लील शिवीगाळ करून चाकूने कापून फेकण्याची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. दोघांविरुद्ध हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (१८ मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

पोलीस अंमलदार मोहन सिंगल यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते हर्सूल पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, बुधवारी (१८ मार्च) दुपारी १ च्या सुमारास त्यांच्यासह पोलीस अंमलदार तडवी, पवार व होमगार्ड गंगावणे हे पीटर मोबाइलने चिमणापूरवाडी येथे संशयिताच्या शोधासाठी जात होते. त्यांना हर्सूल टी पॉइंटवर दुपारी अडीचच्या सुमारासस क्रुझर गाडी (एमएच २० ईई ५३३२) रस्त्याच्या मधोमध संभाजीनगर ते फुलंब्रीकडे जाणाऱ्या बसथांब्यासमोर उभी केल्याचे दिसले. या क्रूझरमुळे वाहतूक खोळंबत होती. रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी ते पाहून वाहन रस्त्याच्या मधोमध का उभे केले, असे क्रुझरचालकाला विचारले.

त्यावर त्याने तुम्हाला काय करायचे आहे, दुसरे कामे करा, असे म्हणत पोलिसांनाच सुनावले. पोलिसांनी त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने हुज्जत घालायला सुरुवात करत, आम्ही नगरसेवक अझहर पठाणचे लोक आहोत, असे म्हणून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करायला करायला सुरुवात केली. तुम्हाला पाहून घ्यावे लागेल, असेही धमकावले. पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, वर्दी उतरवून टाकू, असे त्याने चक्क धमकावले. चालकासोबतच्या व्यक्तीनेही गाडीतून उतरून पोलिसांना चाकूने कापून टाकण्याची धमकी दिली. नंतर दोघे तेथून निघुन गेले. वृत्त लिहीपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस अंमलदार पोपट दहिफळे करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 

Latest News

भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..!  भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी एका नगरसेवकाचे नाव पुढे करून चक्क पोलिसांनाच वर्दी उतरविण्याची धमकी...
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
पिसादेवीत आज संध्याकाळी सहाला टी. राजा सिंह यांची जाहीर सभा
बी.कॉम. झालेला तरुण ड्रग्जच्या आहारी गेला, पत्नी सोडून गेली, तो अधिकच बिघडला... सिटी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software