मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गोरक्षकांकडून सातत्याने सांगण्यात येऊनही उलट त्यांनाच दमदाटी करणाऱ्या फुलंब्री पोलिसांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम आज, १९ मार्चला पहाटे छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केले. फुलंब्री शहरातील कुरेशी मोहल्ल्यात छापा मारून पोलिसांनी ८ गायींना वाचवले. पोलीस येण्याआधीच सहा गायींची कत्तल झालेली होती.

गोरक्षकांकडून सातत्याने फुलंब्री पोलिसांवर आरोप होत असून, पोलिसांकडून गोवंशांची हत्या करणाऱ्यांवर तसेच कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप गोरक्षक करत असतात. मात्र फुलंब्री पोलीस सातत्याने त्यांना खोटे ठरवण्यातच धन्यता मानतात, उलट गोरक्षकांवरच गुन्हे दाखल करण्याचे काम अलीकडच्या काळात फुलंब्री पोलिसांनी केल्याचे दिसून आले आहे. आज पहाटे पोलिसांनीच फुलंब्री पोलिसांच्या डोळ्यांवरील पट्टी उघडली. सकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाची स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलंब्री पोलिसांच्या पथकाला सोबत घेऊन फुलंब्री शहरातील कुरेशी मोहल्ल्यात छापा मारला. पत्र्याच्या शेडमध्ये दोन गायी कापलेल्या अवस्थेत तर चार कापलेल्या गायींचे मुंडके दिसून आले.

पोलिसांना पाहून कत्तल करणारे दोघे जण पळून गेले, तर तिसरा व्यक्ती शेरा उर्फ हुजेब मोहम्मद कुरेशी (रा. क्रांती चौक, समतानगर) याला पकडण्यात आले. त्याने पळून गेलेल्यांची नावे इरफान हमीद कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, फुलंब्री) व फराज कुरेशी उर्फ हिप्या असल्याचे सांगितले. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या ८ गायी मिळून आल्या. या गायी कत्तलीसाठी फारूक कुरेशी, मुस्तफा रफीक कुरेशी, जावेद भाई (पूर्ण नाव माहीत नाही), इद्रीस कुरेशी, हमीद कुरेशी यांनी आणल्याचे समोर आले. पत्र्याच्या शेडसमोरील पिकअप वाहन, कत्तलीसाठीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. एकूण १० लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कत्तल करून कापलेल्या गायींचे अवशेष फुलंब्री नगरपंचायतीच्या कचरा डेपोजवळ जेसीबीच्य साह्याने खड्डा खोदून पुरण्यात आले. वाचवलेल्या ८ गायी पाल (ता. फुलंब्री) येथील गोशाळेत पाठविण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश सोनुने करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software