- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- गौतम अदानींवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेन मागितली भारताची मदत, काय आहे प्रकरण…
गौतम अदानींवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेन मागितली भारताची मदत, काय आहे प्रकरण…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
नवी दिल्ली (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह ग्रुपच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेने भारताची मदत मागितली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन एजन्सी SEC ने भारताच्या कायदा मंत्रालयाकडून मदत मागितली आहे. हे प्रकरण २६५ दशलक्ष डॉलर्सच्या शेअर्समध्ये फेरफार आणि लाचखोरीशी संबंधित आहे. अमेरिकेच्या SEC कडून अदानी ग्रुपची चौकशी […]
नवी दिल्ली (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह ग्रुपच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेने भारताची मदत मागितली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन एजन्सी SEC ने भारताच्या कायदा मंत्रालयाकडून मदत मागितली आहे. हे प्रकरण २६५ दशलक्ष डॉलर्सच्या शेअर्समध्ये फेरफार आणि लाचखोरीशी संबंधित आहे. अमेरिकेच्या SEC कडून अदानी ग्रुपची चौकशी केली जात आहे. SEC ने न्यूयॉर्क न्यायालयाला सांगितले, की गौतम आणि सागर अदानी यांना न्यायालयीन नोटीस बजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोघेही भारतात राहतात.
SEC ने आरोपपत्रात म्हटले आहे की, गौतम अदानी, सागर अदानी आणि इतर सहा जणांनी २०२० ते २०२४ दरम्यान भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिली. ही लाच फायदेशीर सौरऊर्जेचे कंत्राट मिळविण्यासाठी देण्यात आली होती. या कंत्राटातून २० वर्षांत २ अब्ज डॉलर्सचा नफा होण्याची अपेक्षा होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
By City News Desk
Latest News
08 Dec 2025 15:27:55
एकेकाळी मिस इंडिया राहिलेल्या नेहा धुपियाला कारकिर्दीत असाही काळ आला, ज्यावेळी ती आई झाली होती तेव्हा तिला सोशल मीडियावर बॉडी...

