छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६२,३१८ ‘पदवीधर’ मतदार!; मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार मतदारयादीच्या प्रारूप प्रसिध्दीचा ३ डिसेंबर होता. त्यानुसार प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात या कार्यक्रमावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी मंजुषा मिसकर यांच्यासह तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ४६ हजार ४०६ पुरुष, १५ हजार ९०८ महिला व ४ तृतीयपंथी असे एकूण ६२ हजार ३१८ मतदार आहेत. विभागातील आठही जिल्ह्यांत मिळून एकूण १ लाख ८८ हजार ७७१ पुरुष, ५१ हजार ७६३ महिला तर १५ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार आहेत. पुढील अत्यंत महत्वाचा टप्पा, म्हणजेच दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३ डिसेंबर ते १८ डिसेंबर असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकती ५ जानेवारी २०२६ पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी १२ जानेवारी रोजी होणार आहे, अशी माहिती  प्रशासनाकडून देण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software