राजू शिंदे यांच्या धरसोडीवर प्रश्नचिन्ह!, दानवे, जंजाळ म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधानसभा निवडणूक आली की आमदार होण्याचे डोहाळे लागून राजू शिंदे हे भाजप सोडतात, पराभूत झाले की परत भाजपात येतात. यावरून शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ आणि ठाकरे गटाने नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दोन्ही शिवसेना संपविण्याची भाषा करणारे राजू शिंदे यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे, तर पक्ष धरसोडीवरून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी राजू शिंदे यांच्यावर शरसंधान साधले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंबादास दानवे यांनी राजू शिंदे यांना ठाकरे गटात घेत उमेदवारीसुद्धा मिळवून दिली होती. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्याआधी २०१९ मध्येही विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या पक्ष धरसोड वृत्तीमुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही यावेळी त्यांच्या घरवापसीला विरोध केला होता. मात्र तरीही त्यांचा प्रवेश सोहळा मंगळवारी (१८ नोव्‍हेंबर) मुंबईत झाला. भाजपमध्ये येताच त्यांनी दोन्ही शिवसेना संपविण्याचे वक्‍तव्य केले. त्यामुळे दोन्ही शिवसेना संतापल्या आहेत.

अंबादास दानवे म्हणाले, की राजू शिंदे यांना भाजपमधूनच प्रचंड विरोध आहे. दुसऱ्यांना संपविण्याची भाषा करणारे स्वतःच संपतात. त्यांना विशेष महत्त्व देण्याची गरज नाही. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले, की राजू शिंदे यांना २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत शिवसैनिकांनीच पाजी पाजले. त्यांच्यात एवढी धमक होती तर भाजप सोडून ठाकरे गटात का गेले? पक्ष धरसोड का करतात, असा सवालही त्यांनी केला. 

शिल्पाराणी वाडकर यांचा शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र!
शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर यांनी मंगळवारी (१८ नोव्‍हेंबर) पदाचा आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software