शहागंजमध्ये ड्रग्ज तस्करांची पोलिसांनी काढली धिंड!, मुख्य सूत्रधार अश्पाक परराज्‍यात पळून गेल्याची शक्यता

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात नशेचा बाजार मांडणाऱ्या १६ जणांना आजवर पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य सूत्रधार शेख अश्पाक अद्याप फरारी असून, तो राज्‍याबाहेर पळून गेला असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. दोन दिवसांपूर्वी अश्पाकच्या टोळीतील ५ जणांना शहर गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांची धिंड शहागंजमध्ये काढण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी) रात्री किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनीत ड्रग्ज तस्कराच्या घरावर छापा मारून १२ लाख रुपयांच्या ३ हजार नशेच्या औषधीच्या बाटल्‍या जप्त केल्या होत्या. उबेदउल्ला अब्दुला खान (वय ३२, रा. रहेमानीया कॉलनी, राम मंदिराजवळ, किराडपुरा), शेख सोफीयान शेख नजीर (वय ३४, रा. गल्ली नं. २६, बायजीपुरा), अब्दुल नवीद खान अब्दुल समी खान (वय ३१, रा. गल्ली नं. १, खास गेट, जिन्सी पोलीस ठाण्याजवळ), शेख नावेद शेख हमीद (वय २५, रा. लेबर कॉलनी, कॅप्टन कलेक्शनजवळ, फाजलपुरा) व शेख अय्याज ऊर्फ शेरू शेख सिराज (४२, रा. किलेअर्क) यांना अटक केली होती. हे ड्रग्ज तस्कर ज्या भागात नशेच्या औषधाची विक्री करायचे, त्याच भागात बुढीलेन, चंपा चौक, शहागंज, किराडपुऱ्यात त्यांची हातकड्यांसह पायी फिरवत धिंड काढण्यात आली.

अश्पाक फरारीच...
नशेच्या औषधाचा बाजार चालवणाऱ्या टोळीचा म्‍होरक्या शेख अश्पाक आहे. त्याचे १६ साथीदार पकडले गेले तरी तो फरारीच आहे. लातूर, उदगीर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत असे या रॅकेटचे कनेक्शन आहे. अश्पाकला यापूर्वी सिटी चौक पोलिसांनी शस्त्रांच्या तस्करीत अटक केली होती. त्याच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. लातूरच्या त्याच्या साथीदारांना शहरात अटक होताच तो पसार झाला होता. अद्याप सापडला नाही. तो राज्याबाहेर पसार झाल्याचा संशय असून, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीत फिरत असल्याचा अंदाज आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून

Latest News

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांनी मोठा दणका दिसला आहे. कमर्शियल गॅसच्या २००...
आ. विलास भुमरेंनी चक्क लेकाला नेले मतदान केंद्रात, ईव्हीएम मशीनजवळ अन्‌ लेकाच्या बोटालाही शाई लावून घेतली...
जाधववाडी बाजार समितीतील हर्राशी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी!; हमाल-व्यापाऱ्यांतील भांडण पेटले...
छत्रपती संभाजीनगर शहरात कुठेही कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही, तिसरा डोळा टिपणार, जबर दंड लागणार...
बजाजनगरात मतदान केंद्रावर १०० मीटरच्या नियमावरून गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप, चौघांना बोगस मतदानाच्या संशयावरून पकडले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software