शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांनी मोठा दणका दिसला आहे. कमर्शियल गॅसच्या २०० टाक्या (१४० रिकाम्या, ६० भरलेल्या) चोरून नेल्या असून, मोबाइल बंद करून गायब आहेत. एजन्सीमालक महिलेने शोधाशोध केल्यानंतर अखेर शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकांचा शोध सुरू केला आहे.

अंबिका विलासराव पाटील (वय २८,रा. एन ८ सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या HPCL कमर्शियल गॅसची श्री जगदंबा गॅस एजन्सी शहानूरवाडी बीड बायपास येथे चालवतात. त्यांच्याकडे एक ट्रक, लोडींग रिक्षा व जितो छोटा आहे. त्यावर चालक म्हणून अय्याज शब्बीर शेख व जिशान (रा. माणिकनगर, नारेगाव) दोन वर्षांपासून आहेत. बुधवारी (२ फेब्रुवारी) सकाळी १० ला पाटील यांना ग्राहकाचा कॉल आला, की आम्हाला आज गॅसच्या टाक्या पोहचल्या नाहीत. त्यामुळे पाटील यांनी चालक अय्याज व जिशान यांना वारंवार कॉल केले.  मात्र त्यांचे फोन बंद येत होते. ट्रक सिपेट ग्राउंड येथे उभा केला जातो.

त्यामुळे पाटील या सीपेट ग्राउंड येथे गेल्या. तेथे ट्रक (MH 04 FD 5575) उभा दिसला. मात्र ट्रकमध्ये असलेल्या गॅसच्या १३० टाक्या दिसून आल्या नाहीत. पाटील यांनी अय्याजच्या घरी जाऊन विचारपूस केली, तेव्हा अय्याज व जिशान घरी मिळून आले नाहीत. ट्रकमधील टाक्या अय्याज व जिशानने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोरील लोडिंग रिक्षा व जितो रिक्षातील एकूण ६० भरलेल्या टाक्या व १० रिकाम्या टाक्याही दिसूल आल्या नाहीत. पाटील यांच्या अॅक्टिवा स्कुटीची (MH 20 AZ 1077) बॅटरी व ट्रकची बॅटरी व चाव्याही दिसून आल्या नाहीत. यानंतर पाटील यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. ४ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल अय्याज व जिशान यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चंदनसिंग उसारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून

Latest News

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांनी मोठा दणका दिसला आहे. कमर्शियल गॅसच्या २००...
आ. विलास भुमरेंनी चक्क लेकाला नेले मतदान केंद्रात, ईव्हीएम मशीनजवळ अन्‌ लेकाच्या बोटालाही शाई लावून घेतली...
जाधववाडी बाजार समितीतील हर्राशी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी!; हमाल-व्यापाऱ्यांतील भांडण पेटले...
छत्रपती संभाजीनगर शहरात कुठेही कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही, तिसरा डोळा टिपणार, जबर दंड लागणार...
बजाजनगरात मतदान केंद्रावर १०० मीटरच्या नियमावरून गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप, चौघांना बोगस मतदानाच्या संशयावरून पकडले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software