तो अपघात नेमका कसा घडला, FIR मधून आले समोर, रिक्षा अन्‌ कार होत्या राँग साइड..., ३ जखमींवर सुरू आहेत एमजीएममध्ये उपचार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : देवदर्शनावरून परतणाऱ्या दुचाकीस्वार कुटुंबाला राँग साइडने येणाऱ्या ऑटोरिक्षा व कारने उडवले. यात पती, पत्नी आणि त्यांची मुलगी जखमी झाले. ही घटना गुरुवारी (५ फेब्रुवारी) रात्री पावणेआठच्या सुमारास चिकलठाणा आठवडे बाजारसमोर घडली.

किरण मच्छिंद्र बकाल (वय २५, रा. चिकलठाणा पोलीस ठाण्यामागे चिकलठाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते वडील, पत्नी व मुलाबाळांसह राहतात. शेती करतात. गुरुवारी (५ फेब्रुवारी) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ते घरून मोटारसायकलीने (MH 20 EW 3448) पत्नी किर्ती, मुलगी काव्या यांच्यासह केंब्रिज चौकासमोरील साई मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून पावणेआठच्या सुमारास ते परत निघाले. चिकलठाणा आठवडे बाजारसमोर एक रिक्षा (MH 20 BT 8453) व कार (MH 20 GV 5638) एकामागे एक राँग साईडने समोरून येत असल्याचे दिसले.

त्यामुळे बकाल यांनी मोटरसायकल बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत रिक्षा व कारचालकाने त्यांना धडक दिली. तिघांनाही नागरिकांनी चिकलठाण्याच्या मिनी घाटीत दाखल केले. नातेवाइकांनी त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रिक्षा व कारचालकांनी बेदरकारपणे, राँग साईडने वाहने चालवून बकाल यांना धडक दिली व तिघांना जखमी केले. बकाल यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झालेले आहे. तोंडाला, छातीला, बरगडीला मार लागलेला आहे. त्यांच्या पत्नी व मुलीला ओठाला व तोंडाला मार लागून टाके पडले आहेत. सिडको एमआयडीसी पोलिसांनी रिक्षा आणि कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून

Latest News

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांनी मोठा दणका दिसला आहे. कमर्शियल गॅसच्या २००...
आ. विलास भुमरेंनी चक्क लेकाला नेले मतदान केंद्रात, ईव्हीएम मशीनजवळ अन्‌ लेकाच्या बोटालाही शाई लावून घेतली...
जाधववाडी बाजार समितीतील हर्राशी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी!; हमाल-व्यापाऱ्यांतील भांडण पेटले...
छत्रपती संभाजीनगर शहरात कुठेही कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही, तिसरा डोळा टिपणार, जबर दंड लागणार...
बजाजनगरात मतदान केंद्रावर १०० मीटरच्या नियमावरून गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप, चौघांना बोगस मतदानाच्या संशयावरून पकडले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software