मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच ओबीसी आंदोलकांची घोषणाबाजी; काळे रुमाल फडकवले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर त्‍यांनी भाषणास प्रारंभ करताच ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालायला सुरुवात केली. काळे रुमाल फडकवले. ‘हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहिजे’, ‘ओबीसी आरक्षणाला धक्का देणारे सरकार मुर्दाबाद’ आणि ‘छगन भुजबळ झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी ३ आंदोलकांना ताब्यात घेतले.

रामभाऊ कोंडाजी पेरकर (वय ७०), शिवाजी बाबुराव गाडेकर (वय ५९), आणि अशोकसिंग किसनसिंग शेवगण (वय ६२) अशी या आंदोलकांची नावे समोर आली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे. आज आपण मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम करतोय. अशा कार्यक्रमांमध्ये काही लोक येतात आणि घोषणाबाजी करतात, हा खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्रसैनिकांचा मोठा अपमान आहे. केवळ प्रसिद्धीसाठी हे केलं जातंय. मी यावर फार काही बोलणार नाही. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अनेकांत सरकारने फसवणूक केल्याची भावना आहे अशा आंदोलनांतून मराठा आरक्षण सरकारने खरेच दिलेय, अशी भावना तर बळकट केली जात नाही ना, अशी चर्चा होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software