ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य शासनाने विशेष तपास पथक  गठीत केले आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री बावनकुळे म्हणाले, की ६ मार्च २०२६ रोजी विधानपरिषदेत हा विषय चर्चेला आला होता. त्यावेळी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात पोलीस महानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक, नोंदणी उपमहानिरीक्षक तसेच भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक यांचा समावेश आहे.

आवश्यकतेनुसार संबंधित विषयातील तज्‍ज्ञांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे. पथक गठीत केल्याची माहिती स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली जाणार असून, नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी विभागीय आयुक्तांकडे सादर कराव्यात. या विशेष तपास पथकाची कार्यकक्षा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जमीन विषयक गंभीर तक्रारींची सखोल चौकशी करणे आणि त्यानुसार पुढील कार्यवाहीबाबत शासनास शिफारसी करणे अशी आहे. तपास पथक तीन महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करून सविस्तर अहवाल शासनाला सादर करेल, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software