प्रा. राजाराम लोंढे हत्या प्रकरण : अंगठ्या, मोबाइल जप्त करण्यात यश येईना, करण आडेच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येनंतर फावडे, घमेले आणून मृतदेह पुरण्यात मदत करणाऱ्या करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) याच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने वाढ केली. त्याने मुख्य मारेकरी विशाल विकास राठोड (वय २४, रा. गेवराई तांडा) याला मैत्रीपोटी मदत केली होती. दरम्यान, लोंढे यांच्या अंगठ्या व मोबाइल जप्त करण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही. मोबाइलची तोडफोड करून पुण्यातील एका नाल्यात फेकल्याचे विशाल सांगत आहे. मात्र, पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास वाटत नाही. त्याने दुसऱ्या कुणाला तरी सांगून मोबाइल दडवून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. मोबाइल मिळाल्यास बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात.

पोलीस विशालची पोलीस कोठडीत कसून चौकशी करत आहेत. बुधवारी (१८ मार्च) त्याच्या घराची शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या उपस्थितीत पथकाने झडती घेतली. ॲपल कंपनीचा लॅपटॉप, गुन्ह्यासंदर्भात महत्त्वाचे दस्तावेज आणि गुन्ह्यात वापरलेली कार (क्र. एमएच ४६ बीए ६५९८) जप्त करण्यात आली. लोंढेंसोबत आर्थिक व्यवहार असलेल्या चौघांची पोलीस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली. आतापर्यंत उस्मानपुरा पोलिसांनी १३ जणांचा जबाब नोंदविला असून, तपास सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्याकडे आल्याने ते लोंढे यांच्या कुटुंबाचा जबाब नव्याने नोंदविणार आहेत. करण आडेला विशालबाबत माहिती आहे. हत्येनंतर त्यानेच फावडे, घमेल्यासह विशालसाठी दारू आणली होती. त्यामुळे त्याच्या चौकशीतून ठोस काही हाती लागेल, अशी आशा पोलिसांना आहे. हत्येसाठी विशालने उज्जैन येथून पिस्तूल आणल्याचे समोर आले आहे.

अशी केली होती हत्या
राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या हत्या प्रकरणात रीलस्टार विशाल विकास राठोड (वय २४), त्याचा मेव्हणा आकाश विनोद पवार (वय ३२, दोघे रा. रा. गेवराई तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि नातेवाइक करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आलेली आहे. लोंढे ज्योतीनगरात राहत होते. त्यांची पत्नी व दोन मुले पुण्याला राहतात. ते मूळचे सौंदरे (ता. बार्शी) येथील होते. ५ फेब्रुवारीला रात्री लोंढे, विशाल आणि आकाशने दोन महिलांसोबत दौलताबादच्या एका फार्महाऊसवर पार्टी केली. पार्टीनंतर दोन्ही महिला गेल्यावर तिघे फार्महाऊसबाहेर पडले. नगरनाक्यावरून छावणी लोखंडी पूल ओलांडल्यानंतर विशालने बंदूक लोंढेंच्या कानाला लावत गोळी झाडली. ही बंदूक लोंढेंचीच होती, जी पार्टीदरम्यान विशालने काढून घेतली होती. हत्येनंतर करणला बोलावून घेत ६ फेब्रुवारीला सकाळी ६ ते ७ दरम्यान गेवराई तांडा येथे आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला होता. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस!

Latest News

मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस! मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगो विमान कंपनीने ‘समर शेड्यूल'मध्ये छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस केली आहे....
छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा भगवान महावीर जयंती ठरणार आदर्शदायी : ३१ मार्चला भव्य डीजेमुक्त शोभायात्रा, सामाजिक उपक्रमांवर भर, गॅस तुटवड्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम स्थगित
२२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना
प्रा. राजाराम लोंढे हत्या प्रकरण : अंगठ्या, मोबाइल जप्त करण्यात यश येईना, करण आडेच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ
शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software