- News
- पॉलिटिक्स
- गुलाबराव पाटलांनी तोंडावर बोट ठेवत सत्तारांना गप्प बसण्याचा इशारा का केला?
गुलाबराव पाटलांनी तोंडावर बोट ठेवत सत्तारांना गप्प बसण्याचा इशारा का केला?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी (२३ सप्टेंबर) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार हे पुरस्कार वितरणाला चार वर्षे उशीर का झाला, याचा खुलासा करत असताना गुवाहाटीचे कारण सांगत होते, त्यावर लगेचच मंत्री गुलाबराव पाटील यांनी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी (२३ सप्टेंबर) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार हे पुरस्कार वितरणाला चार वर्षे उशीर का झाला, याचा खुलासा करत असताना गुवाहाटीचे कारण सांगत होते, त्यावर लगेचच मंत्री गुलाबराव पाटील यांनी तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा केला…मात्र तरीही सत्तारांनी आपले घोडे पुढे दामटलेच! कार्यक्रमात राजकीय कोपरखळ्यांनी हास्यकल्लोळात सभागृह डुंबून गेले!!

सत्तारानंतर गुलाबराव पाटील यांचे भाषण झाले, ते म्हणाले, की अब्दुल सत्तार हे आमच्या मंत्रिमंडळातील विनोदी पार्ट करणारे मंत्री आहेत. चळवळ करून, संघर्षांना तोंड देऊन या पदापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. माणसांमध्ये राहणारे आम्ही लोक आहोत. काम करणाऱ्याला निवडून देण्यासाठी जनता जात, धर्म, पक्ष बघत नसतात. त्यामुळे आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा आपणच सरकारमध्ये येऊ. आपणच मंत्री होऊ. लागले तर माझे मंत्रिपद तुम्ही घ्या, असे ते सत्तारांना म्हणाले.
स्पर्धेमुळे गावागावात स्वच्छतेसाठी चढाओढ लागली ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती आहे, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. गावाला मिळणारा पुरस्कार हा गावाचे वैभव असतो. आपलं गाव स्वच्छ असावं असे तरुणांना वाटते हे या अभियानाचे यश आहे. गाव स्वच्छ तर मन स्वच्छ. सर्व गावाने मिळून एकोप्याने काम केलं तर नक्कीच गावाची प्रगती होऊ शकते. त्यासाठी गावकऱ्यांनीही आपले सर्व कर नियमित भरणे आवश्यक असते. तसे केले तरच ग्रामपंचायतीकडून लोकांना सेवा दिली जाऊ शकते. ही स्पर्धा तांड्या- वाड्यांपर्यंत नेण्यासाठी तसेच स्पर्धेतील पारितोषिकाची रक्कम वाढविणे ही बाबही शासनाच्या विचाराधीन आहे,असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अभियान संचालक ई रविंद्रन यांनी केले. अभियानाबाबत विभागाची भूमिका प्रधान सचिव संजय खंदारे यांनी मांडली. विजय कदम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला राज्यभरातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 08:07:04
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची...

