धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर त्वचा आणि आरोग्याविषयीचा महत्त्वाचा इशारा देताना प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी नागरिकांना रासायनिक रंगांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. गोंधणे यांनी सांगितले, की बाजारात मिळणाऱ्या अनेक स्वस्त आणि आकर्षक रंगांमध्ये शिसे (Lead), क्रोमियम, पारा यांसारखी घातक रसायने असू शकतात. या रसायनांचा त्वचा, केस आणि डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
संभाव्य दुष्परिणाम
त्वचेवर लालसरपणा व खाज
पुरळ, सूज आणि अॅलर्जी
जुन्या त्वचारोगांचा तीव्र त्रास
डोळ्यांत जळजळ, पाणी येणे किंवा संसर्ग
काही वेळा कायमस्वरूपी डाग पडण्याची शक्यता
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

काय घ्यावी काळजी?
शक्यतो नैसर्गिक किंवा हर्बल रंगांचा वापर करा.
रंग खेळण्यापूर्वी त्वचा व केसांना नारळाचे तेल लावा.
डोळे, नाक आणि तोंड यांचे संरक्षण करा.
रंग खेळल्यानंतर सौम्य साबणाने त्वचा स्वच्छ धुवा.
ॲलर्जी किंवा त्रास जाणवल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. गोंधणे म्हणाले, की होळी हा आनंदाचा सण आहे; पण रासायनिक रंगांमुळे हा आनंद आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. सजग राहून आणि सुरक्षित पद्धतीने सण साजरा करणे अत्यंत आवश्यक आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध

Latest News

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची...
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software