संशयावरून पोलिसांनी मोटारसायकल पकडली, निघाला साराच घोळ!; मछली खडक येथील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मछली खडक येथे पोलिसांनी विनाक्रमांकाची मोटारसायकल पकडली असता मोहम्मद ईरफान मोहम्मद रफीक अहमद (वय २३, रा. सिल्क मिल्क कॉलनी) याच्याकडे कागदपत्रे नव्हती. तो नीट उत्तरेही देत नव्हता. त्‍यामुळे सिटी चौक पोलिसांनी शुक्रवारी (८ ऑगस्ट) त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अंमलदार पुरुषोत्तम जाधव यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शुक्रवारी रात्री पावणेअकराला मछली खडक येथे गस्त घालत असताना पांढरी केटीएम मोटारसायकल सुसाट जात होती. तिला नंबर नव्हता. त्‍यामुळे जाधव यांनी अडवून चालकाला नाव, गाव विचारले. त्याने मोहम्मद ईरफान मोहम्मद रफीक अहमद (वय २३, रा. सिल्क मिल्क कॉलनी) असे सांगितले. मोटारसायकलीवर नंबर प्लेट का नाही, याबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.  मोटारसायकलीच्या कागदपत्रांची मागणी केली असता आता माझ्याकडे कागदपत्रे व आरसी बुक नाही, असे सांगून कागदपत्रे दाखवण्यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे जाधव यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात मोहम्मद ईरफानविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सतीश आहेरकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी

Latest News

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्‍याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने...
संशयावरून पोलिसांनी मोटारसायकल पकडली, निघाला साराच घोळ!; मछली खडक येथील घटना
ड्रग्‍जमाफिया अजय ठाकूरने भरकोर्टात सहायक फौजदाराच्या छातीत मारली लाथ!, छ. संभाजीनगरातील घटनेने पुन्हा पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्‍याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्‍तांना भेटले
छ. संभाजीनगरात महसूल सप्ताहाचा समारोप; स्वतःचे ज्ञान अद्ययावत करून लोकांना सेवा द्या : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software