ड्रग्‍जमाफिया अजय ठाकूरने भरकोर्टात सहायक फौजदाराच्या छातीत मारली लाथ!, छ. संभाजीनगरातील घटनेने पुन्हा पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ड्रग्‍जमाफिया अजय ठाकूर-वाहूळला न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता त्‍याने न्यायालयातच सहायक फौजदार अमरसिंह ठाकूर यांच्या छातीत लाथ मारली. शिवीगाळही केली. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (८ ऑगस्ट) दुपारी १२ च्या सुमारास घडली.

सहायक फौजदार अमरसिंह ठाकूर यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते  पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्‍यांना मोक्काच्या कैद्यांना पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्यासमोर हजर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हातकडी व एसएलआर रायफल घेऊन सरकारी गाडीने हर्सूल जेल येथे सहायक फौजदार ठाकूर हे सहकाऱ्यांसह गेले. तिथून सकाळी साडेदहाला अंमलीपदार्थ तस्कर अजय रमेश ठाकूर-वाहुळ, राणी अजय ठाकूर- वाहुळ, दीपक करमसिंग मलके, अफरीन अस्लम शेख यांना घेऊन गाडीत बसवले व पहिले अतिरिक्‍त सत्र न्यायालयात आणले.

त्‍यावेळी कोर्टातील क्लर्क म्हात्रे यांनी त्‍यांना कोर्ट सुट्टीवर असल्याचे सांगितले. त्‍यामुळे चारही कैद्यांना दुसरे अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्या. कुलकर्णी यांच्यासमोर हजर करण्यात आले. दुपारी १२ ला न्यायालयाने चारही कैद्यांना २१ ऑगस्टची तारीख दिली. त्यानंतर सर्व कैद्यांना पोलिसांनी कोर्ट रूमबाहेर आणले व पुन्हा हातकडी लावली. त्यावेळी अंमली पदार्थ तस्कर अजय रमेश ठाकूर म्हणाला, की माझे नातेवाईक व वकील येणार आहेत. सध्या मी तुमच्यासोबत येत नाही. माझा वकील येऊ द्या. त्यावेळी सहायक फौजदार अमरसिंह ठाकूर यांनी त्‍याला सांगितले, की कोर्टाने पुढील तारीख दिलेली आहे.

पुढील तारखेला तुझे म्हणणे कोर्टाला सांग. आता तुम्हाला थांबवू शकत नाही. वॉरंट ताब्यात मिळालेले आहेत. खाली गाडी उभी आहे. गाडीत बसण्यासाठी चला. त्‍यावर कैदी अजय ठाकूरने वाद घालण्यास सुरुवात केली. हुज्जतबाजी करून शिवीगाळ करत सहायक फौजदार अमरसिंह ठाकूर यांच्या छातीत जोरात लाथ मारली. त्यावेळी अमरसिंह ठाकूर यांनी लगेचच न्या. कुलकर्णी यांच्यासमोर जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. पोलिसांनी अजय ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सुपे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी

Latest News

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्‍याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने...
संशयावरून पोलिसांनी मोटारसायकल पकडली, निघाला साराच घोळ!; मछली खडक येथील घटना
ड्रग्‍जमाफिया अजय ठाकूरने भरकोर्टात सहायक फौजदाराच्या छातीत मारली लाथ!, छ. संभाजीनगरातील घटनेने पुन्हा पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्‍याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्‍तांना भेटले
छ. संभाजीनगरात महसूल सप्ताहाचा समारोप; स्वतःचे ज्ञान अद्ययावत करून लोकांना सेवा द्या : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software