लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्‍याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने भोसकले. यात पेरू विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) पहाटे एकला (मध्यरात्री) घडली.

शेख इम्रान शेख आरेफ (वय ३०, रा. रशीद कॉलनी बागवान गल्ली गरम पानी) यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते पत्नी नाजीया, मुले फैजान व अफान यांच्यासह राहतात. ज्युबली पार्क सिग्नलजवळ पेरूची गाडी लावून पेरू विकतात. गुरुवारी (७ ऑगस्ट) पहाटे एकला (मध्यरात्री) ते जाधववाडी बाजार समितीत पेरूच्या खरेदीसाठी आले होते. मात्र पेरूची गाडी न आल्याने त्याबाबत विचारपूस केली असता पेरूची गाडी येणार नसल्याचे कळले. त्यामुळे ते पायी चालत जाधवमंडीहून आझाद कॉलेजपर्यंत आले.

रिक्षाची वाट पाहत आझाद कॉलेजसमोरील रोडवर थांबले असता पांढऱ्या ॲक्टिवावर तीन लुटारू आले. त्यांनी शेख इम्रानला कोठे जायचे, अशी विचारणा केली. शेख इम्रान यांनी त्यांना मध्यवर्ती बसस्‍थानकडे जायचे असल्याचे सांगितल्याने त्‍यांनी आम्ही तुला बसस्टँडवर सोडतो, असे म्हणून गाडीवर बसवले. गाडीवर बसल्यानंतर ते चाऊस कॉलनीत घेऊन गेले. त्या ठिकाणी तिघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने चाकूने पोटात पाठीवर मारून शेख इम्रान यांना जखमी केले. जखमी अवस्थेत सोडून तिघेही गाडीवरून पळून गेले. काही वेळाने तिथे पोलीस आले. त्यांनी शेख इम्रानला घाटी रुग्णालयात दाखल केले. तिन्ही लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी

Latest News

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्‍याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने...
संशयावरून पोलिसांनी मोटारसायकल पकडली, निघाला साराच घोळ!; मछली खडक येथील घटना
ड्रग्‍जमाफिया अजय ठाकूरने भरकोर्टात सहायक फौजदाराच्या छातीत मारली लाथ!, छ. संभाजीनगरातील घटनेने पुन्हा पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्‍याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्‍तांना भेटले
छ. संभाजीनगरात महसूल सप्ताहाचा समारोप; स्वतःचे ज्ञान अद्ययावत करून लोकांना सेवा द्या : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software