बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (३ मार्च) दुपारी १ च्या सुमारास समोर आली. संगीता संजय शिंदे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीस पाटील कारभारी नरवडे यांनी बाजार सावंगी पोलीस चौकीला कळवले. त्यानंतर पोलीस अंमलदार नवनाथ कोल्हे, दिलीप बनसोड, संजय सपकाळ व संतोष भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. संगीता यांना विहिरीतून बाहेर काढून बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीता शिंदे यांच्या पश्चात पती आणि दोन मुली असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Latest News

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software