छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या कित्येक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्लाम पक्षाची चर्चा सुरू आहे. एमआयएमला सक्षम पर्याय देण्यासाठी शहरातील मोठ्या मुस्लिम गटाने या पक्षाला समर्थन दिले आहे. सोमवारी (२ मार्च)  सायंकाळी इफ्तार पार्टीच्या निमित्ताने या पक्षाची शहरात जोरदार एंट्री झाली आहे. इफ्तार पार्टीसाठी पक्षप्रमुख शेख आसीफ आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप व एमआयएमवर जोरदार टीकास्त्र सोडले.

शेख आसीफ म्हणाले, की भाजप आणि एमआयएम यांची विचारधाराच धर्मांध आहे. दोन्ही पक्ष हिंदू-मुस्लीम मतांच्या बळावर राजकारण करतात. या दोन्ही पक्षांना सेक्युलर पक्षच नको आहेत. देशपातळीवर, राज्य पातळीवर असलेल्या सेक्युलर पक्षांना संपविण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे आम्ही इस्लाम नावाने एक पर्याय दिला आहे. आमचा पक्ष सर्व जातीधर्मांना घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रमजान महिन्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक मुंबईत होईल. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील कार्यकारिणी घोषित करण्यापूर्वी कोअर कमिटी काम पाहणार आहे, असे ते म्हणाले.

कोअर कमिटीची घोषणा करताना त्यांनी या कमिटीमध्ये रफत यारखान, कलीम कुरैशी, अबुल हसन हाशमी, अबू लाला हाश्मी, सलीम पटेल बोरगावकर, जफर बिल्डर, पप्पू कलानी, आरेफ हुसैनी, जमील खान यांचा समावेश केला आहे. शहरात सर्वच पक्षांनी आमदार, खासदार पदे घेतली, मात्र पाण्याचा प्रश्न कोणीही सोडविला नाही. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे सांगून शेख आसीफ म्हणाले, की शहरात पुढच्या कोणत्याही निवडणुकीत इस्लाम पक्ष खाते उडणार हे निश्चित आहे. एकूण इस्लाम पक्षाप्रती शहरात निर्माण झालेले कुतूहल बघता एमआयएमची चिंता नक्कीच वाढल्याचे दिसून येते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना

Latest News

३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना ३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
पैठण/सिल्लोड /गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टिप्पर आणि इको व्हॅन समोरासमोर धडकून व्हॅनमधील दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात...
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software