तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील परिसरातील ४ घटनांनी सध्या सारेच हादरले आहेत. यातल्या ३ घटना तर रांजणगाव शेणपुंजीच्या असून, एक घटना रांजणगाव शेणपुंजीजवळ असलेल्या अंबेलोहळची आहे. एका अल्पवयीन मुलीने पेटवून घेतले तर एका मुलाने विष पिले, तर दोघांनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली आहे.

गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथील मंगल संजय जाधव (वय १७ वर्षे ११ महिने) या  अल्पवयीन मुलीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. तिने ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घेतल्याने कुटुंबीयांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी साडेतीनला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने २३ फेब्रुवारीला हे टोकाचे पाऊल उचलले होते. त्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथील समाधान गायकवाड (वय ३२) यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी अडीचला घाणेगाव येथे विष पिले होते.

नातेवाइक, नागरिकांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी त्यांनी प्राण सोडले. तिसऱ्या घटनेत रांजणगाव शेणपुंजी येथील हनुमाननगरातील अजय किशोर पांचाळ (वय २२) यांनी शनिवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी घरातील सिलिंग फॅनला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. कुटुंबीयांनी तातडीने घाटी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यापूर्वी रांजणगावातील ओमसाईनगरात नववीत शिकणाऱ्या ओमकार जालिंदर पांचाळ (वय १५) या विद्यार्थ्याने शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी घरातील लोखंडी हुकला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software