- News
- ३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण/सिल्लोड /गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टिप्पर आणि इको व्हॅन समोरासमोर धडकून व्हॅनमधील दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर- पैठण महामार्गावरील बिडकीन डीएमआयसी परिसरात रविवारी (१ मार्च) सकाळी १० च्या सुमारास घडला.
बोलेरो जीपने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार अजय शिवाजी जोगदंडे (वय २५, रा. निल्लोड, ता. सिल्लोड) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा फाट्यावर रविवारी (१ मार्च) रात्री घडली. वडोदबाजार पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. अजय मित्रासह दुचाकीने आरो फिल्टरचे पाणी घेण्यासाठी गेला होता. छत्रपती संभाजीनगरहून सिल्लोडकडे येणाऱ्या जीपने दुचाकीला धडक दिली. अजयचे ४ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तो घरापासून ३ किमी अंतरावरील चिंचखेडा गावाजवळील एका हॉटेलमध्ये कामाला जात होता.
कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक देऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात गंगापूर- वैजापूर महामार्गावरील नरहरी रांजणगाव फाटा येथे सोमवारी (२ मार्च) दुपारी २ च्या सुमारास घडली. गंगापूरच्या दिशेने येणाऱ्या कारने वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर अशोक बोडखे (रा. बगडी, ता. गंगापूर) गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 11:09:31
पैठण/सिल्लोड /गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टिप्पर आणि इको व्हॅन समोरासमोर धडकून व्हॅनमधील दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात...

