हिनानगरातील भीषण आगीत ३ संसार खाक, अग्निशमन अधिकारीही आग विझवताना जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील हीनानगरमध्ये मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागून परिसरात घबराट निर्माण झाली. गोदामाला लागूनच असलेली तीन घरे आगीत बेचिराख झाली असून, ३ कुटुंबांचे सर्व संसारोपयोगी साहित्य खाक झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने जीवितहानी टळली. ही घटना मंगळवारी (३ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

देवकुमार पुलिन जाना (रा. चिकलठाणा) यांचा मंडप व डेकोरेशनचा व्यवसाय आहे. मंडप, सोफे, खुर्च्या, विविध रंगाचे मोठे कापड, झुंबर असे विविध सजावटीचे साहित्य गोदामात ठेवले होते. ही जागा कजारिया नामक व्यक्तीची असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. कापड आणि प्लास्टिकचे साहित्य असल्याने क्षणार्धात सर्व साहित्याने पेट घेत आगीचा मोठा डोंब उसळला. आकाशात धुराचे लोट पसरले. घाबरलेल्या नागरिकांनी पाण्याचा मारा सुरू केला.

नगरसेवक मनोज गांगवे, रवी कावडे, काकासाहेब काकडे, रामेश्वर कोरडे, अमजद खान, मतीन पटेल, अग्निशमन विभागाचे अधिकारी अशोक खांडेकर, एस. बी. होळंबे, हरेश्वर घुगे, संजय कुलकर्णी, वैभव बागडे, अशोक वेलदोडे यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मनपाचे ४, शेंद्रा एमआयडीसीचे २  अग्निशमन बंब आणि ६ खासगी टँकरने आग विझविण्यासाठी दोन तास लागले. गोदामागेच असलेली शेख सिराज शेख मेहबूब, नाजिम रज्जाक पठाण, मोहम्मद परवेज आलाम मोहम्मद इस्लाम यांची घरे आगीत सापडली. त्यांचे संसारोपयोगी साहित्य, पाण्याच्या टाक्या, सोलार पॅनल, फ्रीज, कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक झाल्या. गोदामातील पत्रा लागून अग्निशमन अधिकारी हरिभाऊ घुगे यांना जबर दुखापत झाली आहे. आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे सांगण्यात येते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...

Latest News

१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत... १८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १८ मार्चला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ९ पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची...
कर्जबाजारी शेतकऱ्याने ठिबक सिंचनच्या नळीने घेतला गळफास!, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software