जागतिक फार्मसिस्ट दिन विशेष : फार्मसिस्ट वैद्यकीय क्षेत्रातला मुख्य दुवा, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

- सोमेश सोपानराव इंगळे (एम.फार्म.), फार्मसिस्ट, निवेदक, रुग्णसेवक
आज, २५ सप्टेंबरला जागतिक फार्मसिस्ट दिवस यानिमित्त रुग्णसेवक, निवेदक सोमेश सोपानराव इंगळे (एम. फार्म.) यांनी विद्यार्थी, रुग्ण आणि एकूणच समाजाला दिशादर्शक असणारा लेख ‘मेट्रोपोलिस पोस्ट’ वृत्तपत्राच्या वाचकांसाठी पाठवला आहे...

बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर व प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर आपण फार्मसी प्रवेशास पात्र होतो. त्यामध्ये डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म आणि नंतर संशोधन असे कोर्सेस उपलब्ध आहेत. यामध्ये डी.फार्मसी दोन वर्षांचा डिप्लोमा असतो आणि बी.फार्मसी ही चार वर्षांची पदवी असते व पोस्ट ग्रॅज्युएशन एम.फॉर्म ही सुद्धा दोन वर्षांची पदवी आहे. सध्या फार्मसी कॉलेजांचा सुळसुळाट सुटला आहे पण तरी गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्केट मध्ये वाव आहे...

फार्मसी क्षेत्रातील करिअर संधी बघायला गेले तर वैद्यकीय प्रतिनिधी (एम.आर.), औषधनिर्माता, मेडिकल कोडिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आय. टी. प्राध्यापक किंवा मेडिकल इत्यादी संधी कष्टाळू व गरजूंना आहेत. फार्मसिस्ट हा उच्चशिक्षित महानुभाव असतो. तुलनेने मेडिकल अभ्यासक्रम आणि फार्मसी अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो. प्रचंड अभ्यास, मेहनत करून पण फार्मसिस्ट पडद्यामागचा कलाकार म्हणून काम करतो. तो कधीही समोर येत नाही किंवा येऊ दिल्या जात नाही, अर्थात तो सिस्टमचा दोष आहे, पाश्चिमात्य देशांत डॉक्टर आजार सांगेल त्यावर औषधोपचार फार्मसिस्ट करेल अशी प्रथा आहे. दुर्दैवाने आपल्याकडे ते नाही. प्रश्न असा आहे की वैद्यकीय क्षेत्रातला मुख्य दुवा म्हणजे फार्मसिस्ट असतो. रुग्ण आणि डॉक्टर यामधला महत्वाचा घटक असतो. तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे हा मानस आहे आणि तळमळ आहे त्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी आशा आहे...

औषधनिर्मिती आणि औषधविक्री क्षेत्रात भारत जगाला औषधसाठा पुरवतो. भारताला जगाची फार्मसी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. दर्जेदार औषधनिर्मितीमध्ये भारत जगाचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालेला आहे. देशांत सुमारे १२ लाखांपेक्षा जास्त रिटेल केमिस्ट आहेत. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा १ लाखांपेक्षा जास्त आहेत आणि मार्केटमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त ब्रँड आहेत. काही औषधांमध्ये द्रव्य एकसारखेच असतात. ब्रँड नेम वेगळे असते आणि काहींमध्ये नावे सारखीच असली तर केमिकल कन्टेन्ट वेगळी असतात. यामध्ये फार्मसिस्टचे ज्ञान आणि कौशल्य महत्व अधोरेखित करते. योग्य काउन्सिलिंग करून रुग्णांना दिलासा देण्याचं काम करतात. पण यामध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमधील औषध उपलब्ध नसल्यास पर्यायी औषध देण्याचा अधिकार फार्मसिस्टला असावा व रुग्णांच्या आर्थिक फायद्यासाठी कमी किंमतीचे पण दर्जेदार औषध देण्याचा हक्क मिळावा व किरकोळ आजारासाठी समुपदेशन करण्याचा सुद्धा हक्क मिळावा, अस माझं मत आहे. फार्मास्युटिकल कंपनीत किंवा मार्केटमध्ये फक्त फार्मसिस्टलाच अग्रस्थानी प्राध्यान्य मिळावे. मध्यंतरी ऑनलाइन फार्मसी आणि ई फार्मसी नावाची संकल्पना रुजू होऊ पाहत आहे. पण ती रुग्णांच्या फायद्याची नाही हे सुद्धा तज्ञ मंडळीकडून सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे सुमारे ५ लक्ष नोंदणीकृत फार्मसिस्टची संख्या आहे आणि संख्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी शोभिवंत कवचकुंडल ठरणार आहे हे देखील अधोरेखित झालेलं आहे.

आज जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने त्याच्या कार्याचा त्यागाचा ज्ञानाचा गौरव करत असताना अभिमान वाटतो आणि गर्वही वाटतो. आपणही फार्मसिस्ट बंधूंनी मोठ्या मोठ्या रुग्णालयांत अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करून स्वतःचे लायसन्स भाड्याने देऊन उदरनिर्वाह करायला आपण नकार दिला पाहिजे. कारण तिथे मुख्य संचालक म्हणून बसण्याचा सर्वस्वी अधिकार आपला आहे, हे ठासून सांगण्यात आपणही सक्षम असले पाहिजे. औषधनिर्मिती आणि औषधविक्री एकाच प्रोफेशनच्या व्यक्तीकडून व्हावी आणि मूळ मालक आणि फार्मसिस्ट एकच असावा, हे देखील होणे गरजेचे आहे. मी स्वतःफार्मसिस्ट असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. यामुळे जनमाणसांची सेवा करण्याची संधी मिळते. सर्व फार्मसिस्ट-बंधू भगिनींना जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software