- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- EXCLUSIVE : लाडसावंगीत धर्मपरिवर्तन घडवणारे रॅकेट?, हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी आमिषे!...
EXCLUSIVE : लाडसावंगीत धर्मपरिवर्तन घडवणारे रॅकेट?, हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी आमिषे!; नकार देणाऱ्यांना धमक्या?

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लाडसावंगीत धर्मपरिवर्तन घडवणारे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता करमाड पोलीस ठाण्यात दाखल एका तक्रारीमुळे वर्तवली जात आहे. करमाड पोलिसांनी या प्रकरणात ख्रिश्चन धर्मगुरूविरुद्ध शुक्रवारी (१५ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी मला आमिष दाखवले, नकार दिला असता धमक्या दिल्या, असे तक्रारीत एका २७ वर्षीय तरुणाने म्हटले आहे. या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारी दोनला क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल चर्चच्या कंम्पाऊंडमध्ये गेल्यामुळे राहुलने धर्मगुरू मसी ईसाक नोयल याला कॉल केला. त्याने कम्पाऊंडची चावी मागितली. त्यावर नोयल म्हणाला, की तू अगोदर चर्चला यायला सुरुवात कर. राहुल म्हणाला, की मी चर्चला येईल किंवा नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मला धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे मी तुमच्याविरुध्द तक्रार करेल. त्यावर नोयलने राहुलला मी तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली. त्यानंतर राहुलने मित्रांसोबत चर्चा करून या प्रकरणात करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भारत निकाळजे करत आहेत.
अशा प्रकारे किती लोकांना धर्मपरिवर्तन करण्यास केले बाध्य?
दरम्यान, या चर्चमध्ये संशयित धर्मगुरूने किती लोकांचे धर्मपरिवर्तन घडवले, याची चौकशी होण्याची गरज या प्रकरणामुळे निर्माण झाली आहे. स्वतःच्या धर्माचे उदात्तीकरण करताना दुसरा धर्म कसा वाईट आहे, हे सांगण्याचा धर्मगुरूने या प्रकरणात केल्याचे दिसून येते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर आता हे प्रकरण येऊ शकते.