धक्कादायक : १० महिन्यांच्या मुलीसह एकटीच घरात असलेल्या महिलेच्या घरात घुसून चोरट्याचा कहर : दगडाने मारण्याची धमकी देत लूटमार!, गारखेडा हादरले!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गारखेड्यातील कारगिल मैदानाजवळील एका रो-हाउसमध्ये घुसून चोरट्याने बुधवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी साडेसातच्या सुमारास केलेल्या लुटमारीने खळबळ उडाली आहे. महिला दहा महिन्यांच्या मुलीसह एकटीच घरी होती. चोरटा हातात भलामोठा दगड घेऊन घरात शिरला. जीवे मारण्याची धमकी देत दागिन्यांसह ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी (१५ ऑगस्‍ट) पुंडलिकनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जयना राजेश कोठारी (वय २५) या मुलगी, पती व सासू- सासऱ्यांसह राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांचे सासू-सासरे गावाला गेले असून, पती त्यांना आणण्यासाठी गावी गेले होते. बुधवारी सायंकाळी साडेसातला त्या मुलीसह एकट्याच घरी होत्‍या. दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरटा घरात शिरला. त्याच्या हातात मोठा दगड होता. त्‍यामुळे जयना प्रचंड घाबरून गेल्या. दगडाने मारण्याची धमकी देऊन त्याने मुलीसह एका कोपऱ्यात बसायला सांगितले.

त्यानंतर चोरट्याने सासू, सासऱ्याच्या खोलीत जाऊन कपाट उघडून ३०० ग्रॅम वजनाचे अंदाजे २१ कॉइन, ४०० ग्रॅमचे चांदीचे दोन पैंजण व ३१ हजार ५०० रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाला. जयना यांनी पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार दिली. चोरीपूर्वी चोरट्याने रेकी केल्याची शक्‍यता या घटनेत दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. चोर अंदाजे ५.८ फूट उंचीचा असून, त्याने काळा मास्क घातलेला होता. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रकाश डोंगरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...

Latest News

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत... असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्‍तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण...
डॉ. आंबेडकरनगर चौकात वृद्धेला उडवून रिक्षाने ठोकली धूम !
जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!
Health Feature : दिवसभर इअरफोन लावून असता? ऐकू येणार नाही, मानसिक आरोग्यही बिघडेल...
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software