असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्‍तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण आता गाडीचा थांगपत्ता तो सांगत नाही. त्‍याने गाडी परस्पर विकल्याची शक्यता आहे. गाडीमालक प्लॉटिंग व्यावसायिकाने त्‍याला जाब विचारला त्‍याने चक्‍क तंगडे तोडेन, अशी धमकी दिली आहे. त्‍यामुळे प्रकरण आता सिटी चौक पोलीस ठाण्यात गेले आहे...

व्यापारी सय्यद मतीनो‌द्दीन सय्यद मोईन्नोदीन (वय ४६, रा. नवा मोंढा, जाधवमंडी) यांनी या प्रकरणात शुक्रवारी (१५ ऑगस्ट) तक्रार दिली आहे. ते प्लॉट खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. प्लॉटिंग रजिस्ट्रीच्या कामानिमित्ताने त्यांची ओळख सय्यद रशीद सय्यद सुभान याच्यासोबत झाली होती. आर्थिक निकड भासल्याने सय्यद मतीनो‌द्दीन यांनी टोयाटा इनोव्हा क्रिस्टा कार (क्र. एमएच २० इजी २९९७) विकण्याचे ठरवले होते. त्यांनी ही बाब सय्यद रशीदला सांगितली. रशीदने सांगितले की, मी तुमच्या गाडीची विक्री करून देतो. माझ्याकडे वाहन खरेदी करण्याबाबत विचारणा करणारे लोक आहेत. त्यावर मतीनो‌द्दीन यांनी रशीदच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. २६ मार्च २०२४ रोजी अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयामागे मतीनो‌द्दीन यांनी त्‍यांचे वाहन सय्यद रशीदकडे दिले. त्‍यावेळी मतीनो‌द्दीन यांचे नोमान इकबाल सलीम हजर होते. त्यानंतर वेळोवेळी मतीनो‌द्दीन यांनी रशीदची भेट घेऊन व फोनव्दारे गाडी विक्रीबाबत विचारणा केली.

त्यावर सय्यद रशीद याने वाहन लवकरच विकून देतो, तुम्ही काळजी करू नका, गाडी गाहकांना दाखविण्यासाठी व्यवस्थित ठेवलेली आहे, असे सांगितले. मतीनो‌द्दीन यांना  पैशाची गरज असल्याने त्यांनी पाठपुरावा केला असता रशीद टाळाटाळ करत असल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. त्‍याच्याकडे वाहनही दिसत नव्हते. त्‍यामुळे मतीनो‌द्दीन यांनी त्‍याला स्पष्टच विचारले असता त्‍याने तुम्हाला काय करायचे ते करा. मी कोणालाही घाबरत नाही. माझ्या नादी लागू नका. मी तुम्हाला पाहून घेईन, जादा-कमी बोलता तर तंगडे तोडीन, अशा धमक्या दिल्या आहे. अखेर मतीनो‌द्दीन यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी सय्यद रशीद सय्यद सुभान (रा. रजिस्ट्री कार्यालय कंपाऊंडलगत, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भारत धवन करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...

Latest News

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत... असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्‍तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण...
डॉ. आंबेडकरनगर चौकात वृद्धेला उडवून रिक्षाने ठोकली धूम !
जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!
Health Feature : दिवसभर इअरफोन लावून असता? ऐकू येणार नाही, मानसिक आरोग्यही बिघडेल...
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software