जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जावयाला चुलत सासऱ्याने काहीतरी सांगितले. त्‍यामुळेच तो मुलीला नांदवत नाही, असा संशय येऊन भावाच्या कुटुंबीयांनी घरी येऊन हल्ला केल्याची तक्रार ४२ वर्षीय व्यक्‍तीने वाळूज पोलीस ठाण्यात शुक्रवारी (१५ ऑगस्‍ट) केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी अशोक प्रभाकर पवार, भास्कर प्रभाकर पवार, जयश्री प्रभाकर पवार,  कमलबाई प्रभाकर पवार (रा. रामराई ता. गंगापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गणेश गोपीनाथ पवार (वय ४२, रा. रामराई वाळूज ता. गंगापूर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते कुटुंबासह राहतात. शेजारीच त्‍यांचा भाऊ प्रभाकर पवार हेही कुटुंबासह राहतात. बुधवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला गणेश पवार हे घरी असताना अशोक प्रभाकर पवार, भास्कर प्रभाकर पवार, जयश्री प्रभाकर पवार, कमलबाई प्रभाकर पवार आले. त्यांनी गणेश पवार व त्‍यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ सुरू केली. तुम्ही आमच्या जावयाला आमच्याबद्दल काय सांगितले.

तुमच्यामुळे ते आमच्या मुलीला नांदवत नाहीत, असे म्हणून सर्वजण शिवीगाळ करू लागले. गणेश पवार व त्‍यांची आई गिरजाबाई गोपीनाथ पवार हे त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी गणेश यांना हाताचापटांनी मारहाण केली. विटाचे तुकडे फेकून मारले. विटा गणेश यांच्या डोक्याला व खांद्याला लागून मुका मार लागला. गिरजाबाई यांनासुध्दा विटाचे तुकडे लागल्याने कमरेला व डोक्याला मुका मार लागला. तुम्ही आमच्या नांदाला लागलात तर तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत ते निघून गेले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्‍यांनी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार गफ्फार शेख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...

Latest News

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत... असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्‍तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण...
डॉ. आंबेडकरनगर चौकात वृद्धेला उडवून रिक्षाने ठोकली धूम !
जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!
Health Feature : दिवसभर इअरफोन लावून असता? ऐकू येणार नाही, मानसिक आरोग्यही बिघडेल...
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software