सिडको उड्डाणपुलावर भीषण अपघात : कारने धडक देताच रिक्षा उलटून दूरवर फेकली गेली, प्रवासी दाम्‍पत्‍य गंभीर जखमी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको उड्डाणपुलावर वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर शनिवारी (१६ ऑगस्ट) रात्री १०:३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. सुसाट कारने रिक्षाला मागून धडक दिली. यात रिक्षा उलटून दूरवर फेकली गेली. रिक्षातील प्रवासी दाम्‍पत्‍य गंभीर जखमी झाले, तर चालकही जखमी झाला आहे.

अपघात कसा झाला...
चार तरुण दुचाकींनी रामगिरीकडून मुकुंदवाडीकडे जात होते. उड्डाणपूल चढत असतानाच दोन्ही दुचाकी घसरल्याने त्‍यांनी वेग कमी केला. त्‍यांचा तोल जात असल्याचे पाहून मागून येणाऱ्या रिक्षाचालक शेख शाहरुख शेख रज्जाक यांनीही रिक्षाचा वेग कमी केला. मात्र यात मागून येणाऱ्या सुसाट कारची (एमएच-जीक्यू-२२३७) रिक्षाला जोरात धडक बसली. रिक्षा हवेत उडून खाली पडली. नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढत रिक्षा सरळ केली. चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. गंभीर जखमी प्रवासी दाम्पत्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत जखमी दाम्‍पत्‍याची नावे कळू शकली नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...

Latest News

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत... असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्‍तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण...
डॉ. आंबेडकरनगर चौकात वृद्धेला उडवून रिक्षाने ठोकली धूम !
जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!
Health Feature : दिवसभर इअरफोन लावून असता? ऐकू येणार नाही, मानसिक आरोग्यही बिघडेल...
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software