हिट ॲन्‍ड रन : दुचाकीस्वाराला उडवून वाहन पसार, तरुणाचा जागीच मृत्‍यू, पाचोडजवळील घटना

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : घरी परतणाऱ्या २७ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला उडवून वाहन पसार झाले. यात तरुणाचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना पाचोड- पैठण रोडवरील थेरगाव शिवारात गुरुवारी (१४ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

सचिन भिकाजी गाढेकर (रा. चिंचोली, ता. पैठण) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पाचोड पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा शोध सुरू केला आहे. सचिन वैयक्तिक कामासाठी गुरुवारी पाचोडला आला होता. काम आटोपून रात्री घराकडे परतत होता. थेरगावजवळील कोल्हे वस्तीजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला. नातेवाइक, नागरिकांनी त्याला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...

Latest News

असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत... असाही विश्वासघात... इनोव्हा क्रिस्टा गाडी विश्वासाने विकायला दिली, व्यावसायिकावर आता डोक्‍याला लावण्याची वेळ आली!, प्रकरण सिटी चौक पोलिसांत...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्‍तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण...
डॉ. आंबेडकरनगर चौकात वृद्धेला उडवून रिक्षाने ठोकली धूम !
जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!
Health Feature : दिवसभर इअरफोन लावून असता? ऐकू येणार नाही, मानसिक आरोग्यही बिघडेल...
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software