- Marathi News
- सिटी डायरी
- सुखना नदीला पूर, नारेगाव पाण्याखाली!; ५०० हून अधिक घरे-दुकानांत पाणीच पाणी, हर्सूल सावंगी चौकासह शहर...
सुखना नदीला पूर, नारेगाव पाण्याखाली!; ५०० हून अधिक घरे-दुकानांत पाणीच पाणी, हर्सूल सावंगी चौकासह शहरालगतच्या गावांत ढगफुटीसदृश पाऊस
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शुक्रवार (१५ ऑगस्ट) आणि शनिवार (१६ ऑगस्ट) सलग दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शहरालगतच्या हर्सूल सावंगी, चौका, कोलठाण, पळशी, वरुड काजी व पिसादेवी या गावांत पाणीच पाणी साचले आहे. सुखना नदीला मोठा पूर आल्याने नदीपात्रालगतच्या नारेगाव परिसरातील २१ वसाहती पाण्याखाली गेल्या आहेत. पाचशेहून अधिक घरे व दुकानांत पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी झाली असून, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील असलेल्या वरुड काजी, पिसादेवी, हर्सूल सावंगी आणि चौका तसेच वैजापूर तालुक्यातील गारज व लोणी मंडळात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वरुड काजी मंडळात ७२.५ मि.मी. तर पिसादेवी मंडळात ७२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. चौका येथे १००.८ मि.मी. पाऊस पडला. लाडसावंगी मंडळात ७१.३ मि.मी., गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद मंडळात ७४ मि.मी., शेंदूरवादा येथे ६५.३ मि.मी., डोणगाव मंडळात ९१.८ मि.मी. पाऊस कोसळला. वैजापूर तालुक्यातील लोणी मंडळात ११७.३ मि.मी. पाऊस तर गारज मंडळात सर्वाधिक आणि ढगफुटीसदृश १२६.५ मि.मी. पाऊस झाला आहे. कन्नड तालुक्यातील देवगाव येथे ८६.५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही जीवित हानी झालेली नाही, मात्र नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
डॉ. आंबेडकरनगर चौकात वृद्धेला उडवून रिक्षाने ठोकली धूम !
By City News Desk
जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!
By City News Desk
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
By City News Desk
Latest News
17 Aug 2025 20:04:12
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण...