राजीवला पाकचा पुळका!, म्हणाला, राजकारणी शांततेच्या मुद्द्यावर फूट पाडू लागतात…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

२०१६ पासून भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या कामावर बंदी आहे आणि आता टीव्ही आणि चित्रपट अभिनेता राजीव खंडेलवाल याला पाकिस्तानचा पुळका सुटला आहे. शेजारील देशांतील कलाकारांना भारतात काम करण्यापासून रोखणे हे केवळ राजकारण आहे आणि राजकारण्यांना तसे करण्याचा अधिकार नाही, असे त्याचे मत आहे! जिथे शांतता नांदते तिथेही विविध पक्षांचे लोक येऊन हिंदू-मुस्लीम भेद करून द्वेष पसरवतात, […]

२०१६ पासून भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या कामावर बंदी आहे आणि आता टीव्ही आणि चित्रपट अभिनेता राजीव खंडेलवाल याला पाकिस्तानचा पुळका सुटला आहे. शेजारील देशांतील कलाकारांना भारतात काम करण्यापासून रोखणे हे केवळ राजकारण आहे आणि राजकारण्यांना तसे करण्याचा अधिकार नाही, असे त्याचे मत आहे! जिथे शांतता नांदते तिथेही विविध पक्षांचे लोक येऊन हिंदू-मुस्लीम भेद करून द्वेष पसरवतात, असे वक्तव्य त्याने केले आहे.

राजीव खंडेलवाल याने कहीं तो होगा… सारख्या मालिकांमध्ये आणि आमिर या चित्रपटात काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शोटाइममध्ये दिसलेल्या या अभिनेत्याने पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीबाबत आपली प्रतिक्रिया दिली. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या कामावर बंदी घालण्यात आली होती. यापूर्वी फवाद खान, माहिरा खानसह अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूड चित्रपट केले आहेत. राजीव म्हणाला, की माझ्यासाठी टिप्पणी करणेदेखील चुकीचे असेल, कारण मला समजत नाही का? आपण शांततेबद्दल बोलतो, बरोबर? त्यामुळे जिथे शांतता नांदत आहे तिथेही राजकीय पक्षांचे लोक येऊन त्यांना हिंदू-मुस्लिम भेद करतात. त्यामुळे ते चुकीचे आहे.

जणू पाकिस्तान सरकार त्यांना एजंट म्हणून पाठवत आहे. ४८ वर्षीय अभिनेत्याने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राजकारण्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणे अन्यायकारक आहे. हे राजकारण आहे. खूप चुकीचे. लोकांना बंदी घालणारे राजकारणी कोण आहेत? आपले राजकारण काही गोष्टींमध्ये हुकूमशाही आहे. राजीव हे कहीं तो होगा आणि सच का सामना सारख्या प्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करण्यासाठी ओळखला जातो. त्याने आमिर (२००८) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने शियातन (२०११) आणि टेबल नंबर २१ (२०१३) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...

Latest News

तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले... तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील परिसरातील ४ घटनांनी सध्या सारेच हादरले आहेत. यातल्या ३ घटना तर रांजणगाव...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software