छ. संभाजीनगरात इलेक्ट्रिक दुकान व्यावसायिकाची तर सिल्लोडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची आत्‍महत्‍या

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील एएस क्लबजवळील एका झुडुपाला गळफास घेऊन तरुणाने आत्‍महत्‍या केली. ही घटना रविवारी (८ ऑगस्ट) सकाळी दहाच्या सुमारास समोर आली. रोहित नंदकुमार केदारे (वय २१, रा. वाळूज) असे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

रोहितचे वाळूज भागात इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान आहे. तो आई-वडिलांना एकुलता एक होता. शनिवारी दुपारी तो घराबाहेर पडला होता. रविवारी सकाळी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो मिळून आला. घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. त्‍याने आत्‍महत्‍या का केली, अद्याप समोर आलेले नाही.

सिल्लोडच्या रहिमाबादमध्ये हॉटेल व्यावसायिक तरुणाची आत्‍महत्‍या
सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील सुनील बाळू मोरे (वय २७ वर्षे, रा. रहिमाबाद) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (२ ऑगस्‍ट) दुपारी १ वाजता समोर आली. सुनील गावातच हॉटेलचा व्यवसाय करत होता. त्‍याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच नातेवाइकांनी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सुनील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते...

Latest News

आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते... आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिक्रमण हटाव मोहिमेत महापालिकेच्या आततायी भूमिकेमुळे पोलिसांची गोची होताना दिसत आहे. अनेकदा मार्किंग नसते, न्यायालयात...
वैजापूरच्या अंचलगावचा लाचखोर तलाठी गोविंद सबनवाड २ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला!, छ. संभाजीनगरच्या पडेगावमध्ये राहतो
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना कारावासाची शिक्षा, पोलीस निरीक्षकाच्या गालात मारल्याचे प्रकरण
पुन्हा संताप : क्‍लासेसमधून १३ वर्षीय विद्यार्थिनीला घरी आणताना रिक्षात मागे तिच्या बाजूला बसून चालकाने केले अश्लील कृत्‍य, टीव्ही सेंटर भागातील धक्कादायक घटना
तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software