ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सळया घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्‍यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील मंगरुळ फाट्याजवळ (ता. सिल्लोड) शनिवारी (२० सप्‍टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रवि दगडू ढाकरे (वय ४२, रा. अजिंठा, ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे.

ढाकरे हे काही कामानिमित्त सिल्लोडला गेले होते. परतत असताना मंगरुळ फाट्याजवळील हरी ओम जिनिंगसमोर सळया घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांना जोरात धडक दिली. गंभीर जखमी होऊन ते रस्त्यावर पडले. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने पोबारा केला. नागरिकांनी ढाकरे यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघाताची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन काळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध

Latest News

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची...
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software