वेरूळच्या घाटात भीषण अपघात : दोन ट्रकची समोरासमोर धडक, एका ट्रकवरील बॉयलर अंगावर कोसळून दुचाकीस्वार जावई-सासूचा जागीच मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आयशर ट्रक व १६ टायर असलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात आयशर ट्रकवरून बॉयलर नेले जात होते. बेल्ट तुटून हे बॉयलर थेट दुचाकीवरून जाणाऱ्या जावई-सासूवर कोसळले. यात दोघांचाही जागीच चेंदामेंदा झाला. हा भीषण अपघात वेरूळ घाटात आज, ११ सप्‍टेंबरला दुपारी ४ च्या सुमारास घडला. अपघातानंतर ३ वाहतूक वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी सातला बॉयलर बाजूला केले तेव्हा वाहतूक सुरळीत झाली.

khultabanad12 (1)

कचरू सांडू त्रिभुवन (वय ४२, रा. वेरूळ) व त्‍यांच्या सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव (वय ६५, रा. राजीव गांधीनगर, खुलताबाद) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. कचरू हे सासू चंद्रभागाबाई यांना खुलताबादला सोडण्यासाठी वेरूळहून (क्र. एमएच २० जीपी १४०४) जात होते, त्‍यावेळी त्‍यांच्यावर हा काळाने घाला घातला. कन्‍नडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा आयशर ट्रक (एमएच ४२ एक्यू ९६४६) व खुलताबादहून कन्नडकडे जाणारा १६ टायर ट्रक (क्र. एमएच ४० सीक्‍यू ७३५५) यांची समोरासमोर धडक झाली. आयशर ट्रकवरून औद्योगिक वापरासाठीचा बॉयलर नेला जात होता. अपघातानंतर त्याचा बेल्ट तुटला आणि ते रस्त्यावर जोरात आदळले.

death

त्‍याचवेळी कचरू आणि त्यांच्या सासूबाई चंद्रभागाबाई बॉयलरखाली आल्या. खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात त्‍यांना नागरिकांनी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कन्‍नड तालुक्‍यातील मेहेगाव येथील संदीप घुगे हे कुटुंबातील ५ सदस्यांसह खुलताबादला जात होते. त्‍यांच्या कारला बॉयलर येऊन धडकले. त्‍यामुळे कारचा समोरील भाग बॉयलरखाली दबला. सुदैवाने बॉयलर तिथेच थांबला. त्‍यामुळे कारमधील सर्वजण वाचले. कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली. खुलताबाद येथे उरूस सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका वाहनधारकांना बसला. जड वाहतूक बंद असूनही दोन मोठे ट्रक वेरूळ घाटात कसे आले, असा प्रश्न सर्वांना पडला असून, खुलताबाद पोलिसांचा हलगर्जीपणा यात दिसून येत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Latest News

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software