काळाने ‘मैत्र’ हिरावला, बिडकीनचा चहा कट्टा कायमचा झाला सुनासुना!, मनमिळाऊ विशालचा अपघाती मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिक्सर हायवाने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बिडकीन (ता. पैठण) येथे दुर्गा हायस्कूलसमोर मंगळवारी (३० डिसेंबर) सकाळी घडली. विशाल भगवान राठोड (वय २२, रा. सहयोगनगर, बिडकीन) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

बिडकीनहून चितेगावकडे मिक्सर हायवा (क्र. एमएच २० ईजी ८०३३) जात होता, तर विशाल दुचाकीने (क्र. एमएच २० जीएम ७९५७) त्याच्या चहाच्या दुकानावर जात होता. हायवाने इतक्या जोरात धडक दिली, की दुचाकी चक्काचूर झाली. नागरिकांनी धाव घेऊन रुग्णवाहिका बोलावून विशाल आणि त्याच्यासोबत असलेल्या सचिन जाधव (वय २१) याला बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी विशालला तपासून मृत घोषित केले.

सचिनला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. विशाल मूळचा परळीचा होता. त्याचे कुटुंब आता बिडकीनलाच राहते. त्यांच्या घराचे बांधकामही सुरू आहे. विशालने बिडकीनला मैत्र चहाचा कट्टा दुकान चालू केले असून, त्याचे वडील भगवान राठोड लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. विशाल हा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. विशाल सकाळी सहालाच दुकान उघडायचा. मंगळवारी त्याला उशीर झाल्याने वडिलांनी दुकान उघडले. नंतर तो दुचाकीने दुकानाकडे जात असताना काळाने घाला घातला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software