- News
- जिल्हा न्यूज
- अतिवृष्टीने १०० टक्के नुकसान, सरकारचे केवळ शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे नाटक, प्रत्यक्षात पंचनाम्या...
अतिवृष्टीने १०० टक्के नुकसान, सरकारचे केवळ शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे नाटक, प्रत्यक्षात पंचनाम्याला कुणी येईना, शेतकऱ्याने घेतले विष!, सोयगाव तालुक्यातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर्सवरील पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात यंत्रणा हलायला तयार नाही. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतात महसूल व कृषी विभागाचे पथक पाच दिवसांपासून येत नसल्याने संतापलेल्या रामेश्वर हिरा राठोड (वय २५) या अल्पभूधारक शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना मंगळवारी (२३ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता सोयगाव तालुक्यातील धिंगापूर शिवारात घडली.
सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करायला यंत्रणेला वेळ नसल्याचे चित्र आहे. सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने यांचे यंत्रणेवर नियंत्रणच उरले नसल्याचे दिसून येते. त्यांनी या घटनेची आपणास माहिती नाही, असे सांगून हात वर केले. जरंडीचे ग्राम महसूल अधिकारी यश बागुल एका महिन्याच्या रजेवर आहेत. त्यांचा पदभार घोसलाचे ग्राम महसूल अधिकारी गव्हाणे यांच्याकडे आहे. गव्हाणेसुद्धा गायब आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
18 Mar 2026 12:52:17
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाला प्रारंभ होतो. यानिमित्ताने यंदाही हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे बुधवारी (१९ मार्च)...

