हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाला प्रारंभ होतो. यानिमित्ताने यंदाही हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे बुधवारी (१९ मार्च) दुपारी ४ वाजता शहरात शोभायात्रा आयोजित केली आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी (१७ मार्च) पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

मंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल यांना हिंदू म्हणून शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे खैरे यांनी सांगितले. खैरे म्हणाले, की यंदाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रफुल्ल मालाणी असतील. १९ मार्चला संस्थान गणपती येथे ध्वज स्तंभ पूजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल. शोभायात्रेत विविध ७५ हिंदू समाज संघटना आणि सांप्रदाय सहभागी होत आहेत.

या शोभायात्रेत घोडे, उंट, चित्ररथ, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यासह विविध थोर पुरुषांचे सजीव देखावे, विविध सांप्रदायाचे महाराज रथात विराजमान असतील. शोभायात्रेसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत जनार्दन स्वामींचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज सहभागी होतील. त्यांची रथातून मिरवणूक काढण्यात येईल. यानंतर त्यांच्या प्रवचनाने खडकेश्वरच्या शिवमंदिर परिसरात शोभायात्रेचा समारोप होईल. समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहनही खैरे यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन...
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software