- News
- जिल्हा न्यूज
- बजाजनगर, खुलताबादमध्ये आत्महत्येच्या घटना, २ युवकांनी का कवटाळले असेल मरण?
बजाजनगर, खुलताबादमध्ये आत्महत्येच्या घटना, २ युवकांनी का कवटाळले असेल मरण?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बजाजनगरच्या एस.टी. कॉलनीतील युवकाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (९ डिसेंबर) दुपारी दोनला समोर आली.
खुलताबाद तालुक्यातील वढोद खुर्द येथील ३५ वर्षीय देविदास शिवाजी ठाकरे या युवकाने मंगळवारी रात्री गाव शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (१० डिसेंबर) सकाळी समोर आली. देविदास मंगळवारी रात्री घरातून निघून गेले होते. बुधवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. बाजार सावंगी पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बाजार सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला. देविदास ठाकरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास केला जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Mar 2026 23:10:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...

