अहिंसानगरातील स्पोर्ट्‌स बाइकस्वाराचा ट्रॅक्‍टरला धडकून मृत्‍यू

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील अहिंसानगर येथील ऋषीकेश सचिन चोरडिया (वय २४) याची भरधाव स्पोर्ट्‌स बाइक ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून जोरात धडकली. यात ऋषीकेशचा जागीच मृत्‍यू  झाला. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावर फतियाबाद येथील बसथांब्याजवळ रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी घडली.

ऋषीकेश दुचाकीने (क्र. एमएच २० एचई ०००९) छत्रपती संभाजीनगर येथून पाचपिरवाडी जांभळा येथील खडी क्रेशर मशीनकडे जात होता. समोरील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्याची दुचाकी धडकली. तो गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ऋषीकेशच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते...

Latest News

आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते... आता यापुढे थेट पाडापाडी नाहीच!; मार्किंग करा, शंकांचे निरसन करा, पोलीस आयुक्‍तांची भूमिका!!; म्हणाले, विरोध झाल्यास पोलिसांना सामोरे जावे लागते...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिक्रमण हटाव मोहिमेत महापालिकेच्या आततायी भूमिकेमुळे पोलिसांची गोची होताना दिसत आहे. अनेकदा मार्किंग नसते, न्यायालयात...
वैजापूरच्या अंचलगावचा लाचखोर तलाठी गोविंद सबनवाड २ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला!, छ. संभाजीनगरच्या पडेगावमध्ये राहतो
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना कारावासाची शिक्षा, पोलीस निरीक्षकाच्या गालात मारल्याचे प्रकरण
पुन्हा संताप : क्‍लासेसमधून १३ वर्षीय विद्यार्थिनीला घरी आणताना रिक्षात मागे तिच्या बाजूला बसून चालकाने केले अश्लील कृत्‍य, टीव्ही सेंटर भागातील धक्कादायक घटना
तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली!, मंत्रालयात अपंग कल्याण विभागाच्या सचिवपदी काम करणार, १९ वर्षांत इतक्या बदल्या होणारा राज्‍यातील पहिलाच अधिकारी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software