सलग चारदा अतिवृष्टी, मका, कापूस पीक वाया गेले, ३९ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विष पिले!, कन्नड तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीपाचे पीक हातून गेले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ३९ वर्षीय शेतकऱ्याने शेतात विष पिऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना कन्नड तालुक्यातील लोहगाव  शिवारात सोमवारी (३ ऑक्‍टोबर) दुपारी ३ च्या सुमारास समोर आली.

अंकुश भगवान मनगटे (रा. लोहगाव, ता. कन्नड) असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अंकुश यांच्याकडे ४ एकर शेती असून, त्यांनी पेरणीसाठी उसनवारी करून मका व कपाशीची लागवड केली होती. मात्र ऐन मका काढणीवेळी व कापूस वेचणीला आला असताना चार वेळा अतिवृष्टी होऊन हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे कर्ज फेडण्याची चिंता मनगटे यांना सतावू लागली. यातूनच ते नैराश्यात गेले. सोमवारी सकाळी कोणाला काही न सांगता ते घराबाहेर पडले होते. दुपार झाली तरी ते घरी न आल्याने त्यांचे भाऊ त्यांना पहायला शेतात आले. त्यावेळी चिंचेच्या झाडाखाली मनगटे बेशुद्धावस्थेत आढळले.

त्यांनी तत्काळ शेजारील शेतकऱ्यांच्या मदतीने अंकुश यांना चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. यापूर्वी कन्नड तालुक्यातील शफेपूर येथील कृष्णा रावजी दवंगे (वय ४४) या शेतकऱ्याने ३१ ऑक्टोबरला पीक वाया गेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आजवर १५ हून अधिक शेतकरी आत्‍महत्‍या झाल्या आहेत. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. पॅकेज जाहीर झाले, पण आकडे मोठे आहेत, पण प्रत्‍यक्षात शेतकऱ्यांच्या ताटात काहीच नाही, अशी गत आहे. याचा परिणाम सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भोगावा लागू शकतो, अशी परिस्थिती आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ५ महिन्यांच्या गर्भवतीचा घरीच अनधिकृत गर्भपात करण्याचा प्रयत्न तिघांनी तिच्या पती व सासरच्या सांगण्यावरून...
दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software