गंगापूरच्या मांजरी शिवारात ३ चोरट्यांचा धुमाकूळ!; शेतकऱ्याचा कान कापून लुटून नेला लाखाचा मुद्देमाल!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारातील शिंगी रोडवरील गट क्रमांक २४८ मधील शेतवस्तीवर बुधवारी (८ ऑक्टोबर) पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) सुमारास तीन चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेतकरी दाम्‍पत्‍यावर हल्ला चढवून दागिन्यांसह मोबाइल, २ शेळ्या असा १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

सौ. कांताबाई शिवाजी संबळे (वय ५३) व शिवाजी नामदेव संबळे (वय ६२) अशी जखमी शेतकरी दाम्‍पत्‍याची नावे आहेत. ते शेतवस्तीवर राहतात. त्यांची मुले नोकरीसाठी बाहेरगावी आहेत. घराबाहेर पडवीत झोपलेल्या शिवाजी संबळे यांच्यावर अचानक तीन चोरट्यांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्यांचा कान कापला. त्यानंतर घरात झोपलेल्या कांताबाईंना शस्त्रांचा धाक दाखवत दरवाजा उघडण्यास भाग पाडले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल तसेच अंगणात बांधलेल्या दोन शेळ्या चोरून चोरट्यांनी पोबारा केला.

त्यांनी १० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने (किंमत ९० हजार रुपये), एक मोबाईल व दोन शेळ्या मिळून सुमारे १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच आज, ९ ऑक्‍टोबरला सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पालवे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के, अनिरुद्ध शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ठसे तज्‍ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण केले होते. गंगापूर पोलीस ठाण्यात सौ. कांताबाई संबळे यांच्या तक्रारीवरून तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...

Latest News

१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत... १८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १८ मार्चला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ९ पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची...
कर्जबाजारी शेतकऱ्याने ठिबक सिंचनच्या नळीने घेतला गळफास!, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software